Jibud fruit  pudhari photo
रायगड

Jibud fruit demand : रोहा तालुक्यात ‘जिबूड’ची आवक वाढली

नगाला बाजारात ५० ते १५० रुपये भाव, आदिवासी बांधवांना रोजगाराची संधी

पुढारी वृत्तसेवा

रोहे : महादेव सरसंबे

रोहा तालुक्यातुन रोहा बाजारपेठेत सध्या जिबूडची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. असेच काहीसे चित्र रोहा तालुक्यातील कोलाड, नागोठणे, चणेरा बाजारपेठेत दिसून येत आहे. मोठ्या प्रमाणात आदिवासी बांधवासह स्थानीक शेतकरी बाजारात जिबुड विक्रीला आणत आहेत. खवय्यांना चांगला पर्याय बाजारात मिळाला आहे. त्यामुळे या फळाला बाजारात मागणी वाढली आहे.

रोहा बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात पिकलेल्या जिबुडची आवक वाढली आहे. बाजारात जिबूडला साधारणता एक नगाला २०,३०, ५० ते १५० रुपये आकारानुसार दर मिळत आहे. एक शेतकरी किमान, पाच, दहा ते पंधरा जिबुड बाजारात विक्रीस आणत आहे.

साधारणता एक,दोन, अडीच ते तीन किलो पर्यंत जिबुडचे वजन आहे. बाजारात पिवळ्या, किंचित लालसर रंगाच्या जिबुडचा घमघमाट पाहवायास मिळतो. मोठ्या प्रमाणात जिबुड बाजारात विक्रीला उपलब्ध झाला असून आदिवासी बांधवांसह स्थानिक शेतकऱ्यांना चांगला रोजगार हंगामी काळात मिळाला आहे. त्याची विक्री करणाऱ्या आदिवासी बांधवांना यामुळे रोजगाराचे साधन उपलब्ध झाले आहे.

पावसाळा सुरू झाल्यानंतर आदिवासी बांधव व स्थानिक शेतकरी आपल्या परिसरात अथवा परस बागेत एक किंवा दोन गुंठ्यात वाफे करून जिबुडाची लागवड करत असतात.गणेशोत्सवाच्या दरम्यान जिबुड उत्पादनाला सुरुवात होते. साधारणतः एका वेलीस किमान पाच व त्यापेक्षा जास्त जिबुड लागलेले असतात. साधारणता गणेशोत्सव ते दसऱ्यापर्यंत याचा हंगाम असतो. पाऊस व पिकावर या उत्पादनाचे हंगाम कळते.

ग्रामीण भागातील आदिवासी कुटुंबांसाठी हंगामी रोजगाराचे हे महत्त्वाचे साधन ठरत असून, जिबूडच्या वाढलेल्या आवकेमुळे बाजारपेठेतही चांगलीच खवय्यांची खरेदीसाठी लगबग पाहायला मिळत आहे. जिबुड विक्रीतून आदिवासी बांधवांच्या कुटुंबाला उदारनिर्वाला हातभार लागतो. शेतकऱ्यांकडून पिकलेले जिबुड त्यातून बीजे बाहेर काढून राखेत मिसळून पुढच्या वर्षासाठी हे बियाणे जतन केले जाते.

महादेव करे : तालुका कृषी अधिकारी रोहा

स्थानिक शेतकऱ्यांना चांगला फायदा होत असून हे फळ साधारणता ऑगस्टनंतर बाजारात येत असतो. पोटाचा विकारावर गुणकार हे फळ असल्याने नागरिकांना हे फळ उपयुक्त ठरत असतो. आदिवासी बांधव व स्थानिक शेतकरी आपल्या परसबागेत याची लागवड करीत असतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT