Roha Gold Rumour Case Pudhari
रायगड

Roha Gold Rumour Case: रोह्यात सोन्याचे चार हंडे सापडल्याची बातमी ठरली अफवा

आईचे 10 तोळ्यांचे दागिने चुकून कचऱ्यात; रोहा पोलिसांच्या तत्परतेमुळे सोने मूळ मालकाकडे सुपूर्द

पुढारी वृत्तसेवा

रोहा : रोह्यातील वरसे येथील ग्राऊंडवर सोन्याच्या चार हंडे सापडले, अशी जोरदार चर्चा तालुक्यात सर्वत्र पसरली होती.मात्र, ती निव्वळअफवाच ठरली असून,आईचे तब्बल 10 तोळ्यांचे दागिने अनवधानाने कचऱ्यात फेकून देण्याची संतापजनक घटना उघडकीलाआली आहे.ज्याचे दागिने होते ते त्यांना पोलिसांनी शहानिशा करुन परत दिले आहेत. नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये,असे आवाहन रोहा पोलिस निरीक्षक मारुती पाटील यांनी केले आहे.

वरसे येथील अनंत दगडू पवार यांच्याआईचे नुकतेच निधन झाले आहे. आपली आईचे निधन झाल्यानंतर तिचे न वापण्यात येणारे सामान गटारा लगत टाकून दिले होते .त्याच साहित्यात आईकडील दागिन्यांचीही पिशवीही होती.मात्र,याची कल्पना पवार परिवाराला नव्हती. परिसरातील मुले खेळत असतांना त्यांना या वस्तू संशयास्पदरित्या दिसून आल्या. त्यांनी ते साहित्य तपासून पाहिलेअसता त्यात सोन्याचे दागिने असलेली पिशवी मिळाली.

बघता बघता ही वार्ता गावात पोहोचली.सोशल मीडियावरुन तर वरसेत सोन्याचे चार हंडे सापडले अशी ब्रेकींग न्यूज व्हायरल झाली. सर्वत्र जोरदार चर्चाही सुरू झाली. याबाबतची माहिती मिळताच रोह्याचे पोलीस निरीक्षक मारुती पाटील यांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरु केला, तपासादरम्यान एका पिशवीत त्यांना दहा तोळे सोने आढळून आले. विचारपूस केली असता संबंधित सामान हे तेथील रहिवासी अनंत दगडू पवार यांचे असल्याचे समजले. त्यानंतर त्याची पूर्णतः पडताळणी करून संबंधित सोने ताब्यात देण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT