Raigad rain updates pudhari photo
रायगड

Raigad rain updates: कुंडलिका व महिसदरा नदीला पूर; बाहे येथून २२ पर्यटकांना सुखरूप बाहेर काढण्यात 'रेस्क्यू टीम'ला यश

रायगड जिल्ह्यासह रोहा तालुक्यात गेली चार दिवस मुसळधार पावसाचे थैमान सुरू आहे. धो-धो कोसळणाऱ्या पावसामुळे रोहा येथील कुंडलिका आणि महिसदरा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे.

पुढारी वृत्तसेवा

Raigad rain updates

खांब : श्याम लोखंडे

रायगड जिल्ह्यासह रोहा तालुक्यात गेली चार दिवस मुसळधार पावसाचे थैमान सुरू आहे. धो-धो कोसळणाऱ्या पावसामुळे रोहा येथील कुंडलिका आणि महिसदरा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. यामुळे संपूर्ण परिसरात पूरपरिस्थिती निर्माण झाली असून रोहा तालुक्यातील बाहे-देवकान्हे हद्दीत असलेल्या 'एसपी फार्म' येथे पर्यटनासाठी आलेले २० पर्यटक आणि दोन केअरटेकर, असे एकूण २२ जण पुराच्या पाण्यात अडकले होते. त्यांना सागर डहिंबेकर यांच्या 'एसव्हीआरएसएस रेस्क्यू टीम'ने आणि बाहे गावातील तरुणांच्या सहकार्याने सुखरूप बाहेर काढले.

रोहा तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांत पाणी साचून पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान, तालुक्यातील बाहे येथे काही तरुण पावसाचा आनंद घेण्यासाठी व मौजमजा करण्यासाठी एका फार्म हाऊसवर गेले होते. मात्र, अचानक परिसरातील महिसदरा नदीने धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे तिथे पूर आला आणि हे पर्यटक त्याच ठिकाणी अडकून पडले.

या घटनेची माहिती मिळताच तातडीने सागर दाहिंबेकर यांच्या रेस्क्यू टीमला पाचारण करण्यात आले. त्यांनी कमालीचे प्रसंगावधान राखत आणि बाहे येथील स्थानिक तरुणांच्या मदतीने तातडीने बचावकार्य राबवून सर्वांची सुखरूप सुटका केली. अडकलेल्या पर्यटकांना सुरक्षितपणे बाहेर काढल्यानंतर, सर्व पर्यटकांनी आणि ग्रामस्थांनी रेस्क्यू टीमचे मनापासून आभार मानले व त्यांच्या कामगिरीचे कौतुक केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT