रोह्यात अतिक्रमण विरोधात धडक मोहीम  pudhari photo
रायगड

Roha encroachment drive : रोह्यात अतिक्रमण विरोधात धडक मोहीम

वाढत्या वाहतूक कोंडीच्या पार्श्वभूमीवररोहा-अष्टमी नगर परिषदेचा उपक्रम

पुढारी वृत्तसेवा

रोहे ः महादेव सरसंबे

रोहा-अष्टमी नगर परिषदेच्या वतीने रोहा शहरातील रोहा कोलाड मार्गावरील फिरोज टॉकीज ते नवरत्न हॉटेलपर्यंत अतिक्रमण हटाव मोहीम घेण्यात आले आहे. अनाधिकृत टपऱ्या, हातगाडी, अनधिकृत सेड पाडण्याचे काम जोरदार सुरू आहे. रोहा अष्टमी नगर परिषदेच्या वतीने अतिक्रमणाच्या विरोधात धडक मोहीम हाती घेतली आहे.

फिरोज टॉकीज ते दमखाडी या दरम्यान सातत्याने वाहतूककोंडी होत आहे. त्यामुळे नागरिकांना त्रास होतो असल्याचे सातत्याने दिसून येत आहे. या अनुषंगाने नगराध्यक्ष वनश्री शेडगे यांनी रोहा शहरातील वाढत्या वाहतूक कोंडीच्या पार्श्वभूमीवर रस्ते रुंदीकरण व रस्त्यालगत असणारे अतिक्रमण हटवण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना आदेश दिले होते. यानुसार रोहा शहरातील रस्त्यावर होत असलेल्या अतिक्रमणांमधील रोहा अर्बन बँक ते पोस्ट ऑफिस जवळील अतिक्रमण हटविण्यात आले.

यावेळी स्वतः नगराध्यक्ष वनश्री शेडगे, उपनगराध्यक्ष अहमदजी दर्जी,मुख्याधिकारी अजयकुमार एडके,बांधकाम सभापती राजेंद्र जैन,सभापती नीता हजारे, गटनेते महेंद्रजी गुजर, सामाजिक कार्यकर्ते प्रेषित बारटक्के, स्वप्नील धनावडे व संबंधित अधिकाऱ्यांनी सदर जागेची प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली.

त्याचसोबत तीनबत्ती नाक्याजवळील अतिक्रमण हटवण्यासाठी ही पाहणी करण्यात आली व अतिक्रमण हटवण्यासाठी तेथील नागरिकांना कळविण्यात आले. त्याचसोबत अतिक्रमण हटविताना स्थानिक नागरिकांना येणाऱ्या समस्या ही आपण सोडवू असे विश्वास ही नगराध्यक्ष वनश्री शेडगे यांनी दिले

आपण ही कार्यवाही आपल्या रोहा शहरातील होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी व त्यातून भविष्यात होणारे अपघात टाळण्यासाठी करीत आहोत कार्यवाहीसाठी नागरिकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचे आनंद आहे व भविष्यात ही रोहा शहरातील नागरिकांसाठी योग्य ते पाऊल उचलू हा विश्वास ही सर्व नागरिकांना मी देतो.
वनश्री शेडगे, नगराध्यक्ष रोहा अष्टमी नगरपरिषद

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT