रोहे राष्ट्रवादीत (अप) इच्छुकांची भाऊगर्दी  pudhari photo
रायगड

Roha Ashtami municipal election : रोहे राष्ट्रवादीत (अप) इच्छुकांची भाऊगर्दी

विरोधकांची जुळवा जुळव,अद्याप अर्जच नाही; गुरुवारीही अर्ज दाखल नाही

पुढारी वृत्तसेवा

रोहे ः महादेव सरसंबे

रोहा अष्टमी नगरपरिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना राष्ट्रवादी पक्षात मात्र उमेदवारीसाठी इच्छुकांची गर्दी असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे राष्ट्रवादी ( अजित पवार गट ) पक्षाचे उमेदवारी ही अद्याप जाहीर होताना दिसत नाहीत.

रोहा अष्टमी नगरपरिषद निवडणुकीत खा. सुनील तटकरे यांच्या बालेकिल्ल्यात शिवसनेने ( शिंदे गट ) आव्हान दिले आहे. असे असले तरी शिवसेना ( शिंदे गट ) यासह विरोधकांची मात्र उमेदवारांची जुळवाजुळव सुरू असल्याचे दिसून येत आहे. दुसरीकडे भारतीय जनता पार्टी मात्र सावध भूमिका घेताना दिसून येत आहे. 10 नोव्हेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तारीख सुरू झाली असली तरी रोहा अष्टमी नगर परिषदेसाठी 13 तारखे पर्यंत एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही.

राष्ट्रवादी ( अजित पवार गट ) पक्षात थेट नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीवरून तर्क वितर्क वर्तवली जात आहेत. रोहा अष्टमी नगरपरिषद निवडणुकीचे राष्ट्रवादी पक्षाचे सर्व अधिकार खा. सुनील तटकरे यांना देण्यात आले आहेत. त्यामुळे नेहमीप्रमाणे खा. सुनील तटकरे शेवटच्या क्षणी उमेदवारी जाहीर करतात का हे पाहावे लागणार आहे. खा. सुनील तटकरे रोहा अष्टमी नगरपरिषद निवडणुकीसाठी निष्ठवंतांची बळी देत नव्यांना संधी देणार का असाही चर्चा होताना दिसत आहे. तर दुसरीकडे नव्याने आलेल्यांना समाधानकारक योग्य सन्मान देणार का असे बोलले जात आहे.

या निवडणुकीत भारतीय जनता पार्टी सावध भूमिका घेत पावले टाकताना दिसत आहे. अद्याप भाजपचे कोणाबरोबर युती करायचे हे मात्र गुलदस्तात आहे. रोहा अष्टमी शहरात शिवसेना ( उबाठा ) ला मानणारा मोठा मत प्रवाह आहे. त्यामुळे या निवडणुकीत नेहमीप्रमाणे त्यांचेही उमेदवार विजयला गवसणी घालताना दिसतील असे बोलले जात आहे. रोहा अष्टमी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युती आघाड्याबाबत तर्क वितर्क चर्चेला जात आहे त्यामुळे कोणते पक्ष एकत्रित येतील हे पाहावे लागेल.

नगराध्यक्षपदावरुन दोन मतप्रवाह

राष्ट्रवादी ( अजित पवार गट ) पक्षाकडे थेट नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीबद्दल दोन मतप्रवाह आहेत. असेही बोलले जात आहे. नेमके कोणते मतप्रवाह भारी पडणार अथवा सन्मानपूर्वक तोडगा खा. सुनील तटकरे काढणार का याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. रोहा अष्टमी नगरपरिषदेच्या निवडणुकीत शिवसेना ( शिंदे गट ) राष्ट्रवादी ( अजित पवार गट ) ला आव्हान देताना दिसत आहे. रोजचे पक्षप्रवेश पाहता चांगली ताकद शिवसेना ( शिंदे गट ) ची निर्माण होताना दिसत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT