Accident Pudhari file photo
रायगड

Revdanda Bike Accident: पत्नीला घरी आणण्यासाठी निघाले, पण वाटेतच काळाचा घाला; ३२ वर्षीय तरुणाचा मृत्यू

अलिबाग-रोहा मार्गावर दोन दुचाकींची समोरासमोर धडक

पुढारी वृत्तसेवा

रेवदंडा: पत्नीला रोहा येथून घरी आणण्यासाठी मोटारसायकलवरून निघालेल्या ३२ वर्षीय तरुणाचा समोरून आलेल्या भरधाव बुलेट मोटारसायकलशी झालेल्या भीषण अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. हा अपघात शनिवार, ५ सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास सुडकोली गावाच्या हद्दीत अलिबाग-रोहा मार्गावर घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिकेत अशोक भगत (वय ३२, रा. उमटे, पो. रामराज, ता. अलिबाग) हे पत्नीला रोहा येथून घरी आणण्यासाठी त्यांच्या मोटारसायकलवरून अलिबाग-रोहा मार्गाने जात होते. सुडकोली परिसरात ते आले असता रोहा बाजूकडून अलिबागच्या दिशेने येणाऱ्या बुलेट मोटारसायकलने त्यांच्या मोटारसायकलला समोरून जोरदार धडक दिली.

धडक इतकी भीषण होती की, अनिकेत भगत यांच्या डोक्याला व चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली. गंभीर दुखापतीमुळे त्यांचा मृत्यू झाला. अपघातात दोन्ही मोटारसायकलींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून बुलेटस्वारालाही लहान-मोठ्या दुखापती झाल्या आहेत.

या प्रकरणी अमित पोपटराव जाधव यांच्याविरुद्ध रेवदंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेची फिर्याद अशोक चांगू भगत (वय ६३, रा. उमटे) यांनी दिली असून, ५ सप्टेंबर रोजी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक म्हशीलकर, रेवदंडा पोलीस ठाणे करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT