Alibaug News Pudhari
रायगड

Alibaug News: स्वतःच्या पैशातून सुरू विद्यार्थ्यांची तपासणी; राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमातील कर्मचाऱ्यांची व्यथा

बालकांच्या आरोग्याची जबाबदारी खांद्यावर, पण पथकांकडे वाहनच नाही!

पुढारी वृत्तसेवा

अलिबाग: शाळा आणि अंगणवाड्यांमधील हजारो बालकांच्या आरोग्य तपासणीची जबाबदारी सांभाळणाऱ्या राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमातील (आरबीएसके) पथकांवर सध्या दुहेरी संकट ओढवले आहे. एकीकडे वाहनांच्या अभावामुळे गावोगावी पोहोचणे कठीण झाले आहे, तर दुसरीकडे अनेक वर्षांपासून सेवासमावेशनाच्या प्रतीक्षेत असलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी वाढत आहे.

रायगड जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत २८ आरोग्य पथके कार्यरत आहेत. प्रत्येक पथकात डॉक्टर, परिचारिका आणि आरोग्य कर्मचारी विद्यार्थ्यांची तपासणी करून विविध आजारांचे निदान व उपचारासाठी मार्गदर्शन करतात. पनवेल तालुक्यात सर्वाधिक पाच पथके कार्यरत असून उर्वरित तालुक्यांमध्येही गरजेनुसार पथके नियुक्त करण्यात आली आहेत.

मात्र, या पथकांसाठी भाडेतत्त्वावर उपलब्ध करून देण्यात आलेल्या वाहनांच्या निविदा मार्च २०२६ मध्ये संपल्या. त्यानंतर अद्याप नवीन निविदा प्रक्रिया पूर्ण न झाल्याने वाहने बंद झाली आहेत. परिणामी, पथकांना दुर्गम भागातील शाळा आणि अंगणवाड्यांपर्यंत पोहोचण्यासाठी स्वतःच व्यवस्था करावी लागत आहे.

विशेष म्हणजे, वाहनांची सुविधा नसतानाही आरोग्य कर्मचाऱ्यांनी सेवा थांबविलेली नाही. अनेक कर्मचारी बस, रिक्षा किंवा खासगी वाहनांचा वापर करून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचत आहेत. यासाठी होणारा खर्च मात्र त्यांनाच स्वतःच्या खिशातून करावा लागत आहे. शासनाकडून कोणतेही स्वतंत्र प्रवासभत्ते किंवा आर्थिक मदत मिळत नसल्याची खंत कर्मचारी व्यक्त करीत आहेत.

याचबरोबर राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कर्मचाऱ्यांच्या सेवासमावेशनाचा मुद्दाही अजून प्रलंबित आहे. मार्च २०२४ मध्ये दहा वर्षांहून अधिक सेवा पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांना सेवेत सामावून घेण्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र, सुमारे २७ महिने उलटूनही त्याबाबत कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही.

बालकांचे आरोग्य अबाधित ठेवण्यासाठी अहोरात्र मेहनत घेणाऱ्या या कर्मचाऱ्यांच्या समस्या शासनाने गांभीर्याने घ्याव्यात, वाहनांची तातडीने व्यवस्था करावी आणि सेवासमावेशनाचा निर्णय मार्गी लावावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे आणि अंगणवाड्यांमधील हजारो बालकांच्या आरोग्य तपासणीची जबाबदारी सांभाळणाऱ्या राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमातील (आरबीएसके) पथकांवर सध्या दुहेरी संकट ओढवले आहे. एकीकडे वाहनांच्या अभावामुळे गावोगावी पोहोचणे कठीण झाले आहे, तर दुसरीकडे अनेक वर्षांपासून सेवासमावेशनाच्या प्रतीक्षेत असलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी वाढत आहे.

रायगड जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत २८ आरोग्य पथके कार्यरत आहेत. प्रत्येक पथकात डॉक्टर, परिचारिका आणि आरोग्य कर्मचारी विद्यार्थ्यांची तपासणी करून विविध आजारांचे निदान व उपचारासाठी मार्गदर्शन करतात. पनवेल तालुक्यात सर्वाधिक पाच पथके कार्यरत असून उर्वरित तालुक्यांमध्येही गरजेनुसार पथके नियुक्त करण्यात आली आहेत.

मात्र, या पथकांसाठी भाडेतत्त्वावर उपलब्ध करून देण्यात आलेल्या वाहनांच्या निविदा मार्च २०२६ मध्ये संपल्या. त्यानंतर अद्याप नवीन निविदा प्रक्रिया पूर्ण न झाल्याने वाहने बंद झाली आहेत. परिणामी, पथकांना दुर्गम भागातील शाळा आणि अंगणवाड्यांपर्यंत पोहोचण्यासाठी स्वतःच व्यवस्था करावी लागत आहे.

विशेष म्हणजे, वाहनांची सुविधा नसतानाही आरोग्य कर्मचाऱ्यांनी सेवा थांबविलेली नाही. अनेक कर्मचारी बस, रिक्षा किंवा खासगी वाहनांचा वापर करून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचत आहेत. यासाठी होणारा खर्च मात्र त्यांनाच स्वतःच्या खिशातून करावा लागत आहे. शासनाकडून कोणतेही स्वतंत्र प्रवासभत्ते किंवा आर्थिक मदत मिळत नसल्याची खंत कर्मचारी व्यक्त करीत आहेत.

याचबरोबर राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कर्मचाऱ्यांच्या सेवासमावेशनाचा मुद्दाही अजून प्रलंबित आहे. मार्च २०२४ मध्ये दहा वर्षांहून अधिक सेवा पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांना सेवेत सामावून घेण्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र, सुमारे २७ महिने उलटूनही त्याबाबत कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही.

बालकांचे आरोग्य अबाधित ठेवण्यासाठी अहोरात्र मेहनत घेणाऱ्या या कर्मचाऱ्यांच्या समस्या शासनाने गांभीर्याने घ्याव्यात, वाहनांची तातडीने व्यवस्था करावी आणि सेवासमावेशनाचा निर्णय मार्गी लावावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT