Rasayani-Kon Road Traffic
खोपोली : रसायनी कोन रस्त्यावरील कैरी इंडेव्ह लॉजिस्टिक गोडाऊनच्या अनियोजित मागणीनुसार कंटेनर ट्रॉलीच्या लांबच्या लांब रांगा लागल्याने वाहतूक कोंडी होत आहे. ही वाहने या रस्त्यावर एकतर्फी रस्ता अडवून तासनतास उभी असतात.
ट्रक वाहतूकदारांच्या व लॉजिस्टिक कंपनीच्या मधील व्यवहारीक करारानुसार कैरी इंडेव्ह लॉजिस्टिक येथील परिसरात स्वतः ची पार्किंग असणे गरजेचे आहे. परंतु, अनेकदा पार्किंगसाठी जागा उपलब्ध नसल्याचे पहायला मिळत आहे.
असे असतानाही कंपनीकडून शेकडो ट्रक मालवाहतुकीसाठी मागवले जातात. त्यामुळे सर्रासपणे नियमांचे उल्लंघन होत असल्याचे चित्र समोर येत आहे.