तौफिक निसार ठाणगे  pudhari photo
रायगड

Raigad Crime : विश्वासघाताची परिसीमा; लग्नाच्या बहाण्याने शारीरिक शोषण

ममदापूर येथील कॉलेजमधील प्रकार; लॅब असिस्टंटला अटक

पुढारी वृत्तसेवा

नेरळ : कर्जत तालुक्यातील ममदापूर येथील एका कॉलेजमधील एक धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. सदर कॉलेजमधील कार्यरत लॅब असिस्टंटने कॉलेजमधील शिक्षण घेणाऱ्या 19 वर्षीय मुलीला लग्नाचे आमिष दाखवत अत्याचार केले आहेत. पीडित मुलीच्या तक्रारीनुसार संबंधित लॅब असिस्टंटच्या विरोधात गुन्हा दाखल झाला असून त्याला लोणावला पोलीसांनी अटक केली आहे.

नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणासाठी चर्चेत असलेले नेरळगावाजवळील ममदापूर येथील एका नामांकित इंजिनिअरिंग महाविद्यालयात इंजिनिअरिंगचे शिक्षण घेणाऱ्या एका समाजातील 19 वर्षीय विद्यार्थिनीला कॉलेजमधीलच लॅब असिस्टंट हुद्द्यावर कार्यरत असलेला व ममदापूर येथे राहाणारा विवाहित तौफिक निसार ठाणगे याने तिच्याशी ओळख वाढवली. त्या ओळखीतून जवळीक निर्माण करून त्याने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढत, लग्नाचे खोटे आमिष दाखवत अत्याचार करत, पीडितेची फसवणूक केली.

पीडित तरूणीने 19 मार्च रोजी ठाणे येथील मध्यवर्ती रेल्वे पोलीस स्टेशनमध्ये झिरो एफआयआर दाखल केला होता. सदर गुन्ह्यातील गांभीर्य ओळखून, ठाणे येथील मध्यवर्ती रेल्वे पोलीसांनी हा झिरो एफ आय आर हा पुढील तपास व कार्यवाही करीता लोणावळा ग्रामीण पोलिसांकडे वर्ग केला असता, लोणावळा ग्रामीण पोलिसांनी या गुन्ह्याची दखल घेत, तात्काळ कार्यवाही करत, ममदापूर येथील आरोपी तौफिक निसार ठाणगे याला अटक करण्यात आली आहे.

सदर घडलेल्या धक्कादायक घटनेमुळे नेरळ व आजूबाजूचे परिसरातील महाविद्यालयीन वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे. जर शैक्षणिक संस्थांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडूनच विद्यार्थिनींची अशी फसवणूक होत असल्याची घटना समोर आल्याने, मात्र पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

हा धक्कादायक प्रकार हा संबंधित कॉलेजमधील प्राचार्य व चेअरमन यांच्या लक्षात आला नाही का? अशा कर्मचारी वर्गावर धाक नाही का? या पुढे देखील कॉलेज प्रशासन असा झालेल्या प्रकारानंतर दखल घेण्याचे गांभीर्य दाखवणार का? असे अनेक सवाल हे पालकवर्गाकडून उपस्थित केले जात आहेत. तर या धक्कादायक प्रकारामुळे विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न मात्र पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. सदर गुन्ह्यातील तपास हा लोणावळा ग्रामीण पोलिस करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT