Ranbajire Dam Pudhari
रायगड

Ranbajire Dam: रानबाजीरे धरणात मुबलक पाणीसाठा; 22 गावांचा प्रश्न सुटला

या वर्षी जून च्या शेवटच्या टप्यात धरण मधून पाणी चाहु लागल्याने उशिरा पाऊस सुरू होऊन सुद्धा वाहू लागल्याने टँकर मुक्ती कडे वाटचाल सुरू झाली आहे.

पुढारी वृत्तसेवा

पोलादपूर: जून महिन्यापासून तिसऱ्या आठवड्यात सुरू झालेल्या पावसाने दमदार पर्जन्यवृष्टी केली आहे. पोलादपूर मध्ये दुसऱ्यांदा शतकी नोंद झाली आहे. २९ जून पर्यत पोलादपूर मध्ये चाळीस टक्के पाऊस झाला आहे तर महाबळेश्वर खोऱ्यातील प्रतापगड परिसरात सुद्धा मुसळधार पाऊस पडल्याने सदरचे पाणी व पोलादपूर मधील पावसाचे पाणी तालुक्यातील नद्यामार्गे सावित्री नदी वरील औद्योगिक वसाहत च्या मालकीचे असलेले रानबाजीरे धरण शनिवारी दुपारी नंतर वाहू लागले.

यामुळे एमआयडीसीसह महाड सह महाड तालुक्यातील २२ गावाचा पाणी टंचाई चा प्रश्न मिटला आहे. या वर्षी जून च्या शेवटच्या टप्यात धरण मधून पाणी चाहु लागल्याने उशिरा पाऊस सुरू होऊन सुद्धा वाहू लागल्याने टँकर मुक्ती कडे वाटचाल सुरू झाली आहे.

पोलादपूर तालुक्यातील बाजीरे गावात सावित्री नदीवर औद्योगिक विकास महामंडळ ने १९९५ मध्ये बाजीरे येथे धरण बांधले. या धरणात मुबलक पाणी साठा सचल्याने काही प्रमाणात बाहेर सोडण्यात येत आहे मात्र या धरणातील पाण्याचा वापर दुर्दैवाने पोलादपूर साठी होत नाही हे आजही खेदजनक म्हणावे लागेल.

तालुक्यातील चोळई ,कामथी, ढवली ,घोडवनी नद्यांचे पाणी उत्तर वहिनी सावित्रीनदीला पाणी मिळते ते पाणी थेट महाड मार्गे पुढे मार्गस्त होत समुद्राला भेटत सावित्री नदीच्या पात्रावर रानबाजीरे येथे 1995 मध्ये सुमारे 12 कोटी रुपये खर्ची करत 320 मीटर लांबीचे धरण एम आय डिसी च्या माध्यमातून उभारण्यात आले या धरणाला 8 गेट असून दोन दिवसांपूर्वी मुसळधार पावसाने 55.92 मीटर्स पातळी ओलांडली होती या वर्षी सदरची पातळी जून महिन्यात ओलांडल्या नंतर जुलै ऑगस्ट सप्टेंबर मध्ये पडणाऱ्या पावसाने अधिक विसर्ग होणार आहे.

धरणावर महाड औद्योगिक वसाहत मधील कंपन्या ग्रामपंचायत मधील गावे तसेच रासायनिक सांडपाणी मुले खाडी पट्टा भागातील 22 गावांना याचा पाणीपुरवठा केला जातो मात्र या पोलादपूर तालुक्यातील बाजीरे येथे बांधण्यात आलेल्या या धरणाचा पोलादपूर ला काडीचा उपयोग होत नाही.

महाबळेश्वर खोऱ्यात सुद्धा पावसाचे प्रमाण चांगले असल्याने घाटातील पावसाचे पाणी घोडवनी नदी द्वारे सावित्री नदीत एकरूप होते या वर्षी मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई जाणवत असल्याने ठिकठिकाणी टँकर सुरू करण्यात आले होते.

तर महाड शहराला नडगाव येथील तलावातील पाणी टँकर द्वारे पुरविण्यात येत होते या वर्षी लवकरच बाजीरे धरण फुल्ल झाल्याने या धरणातील पाणी महाड शहर सह पोलादपूर तालुक्यातील गावांना पुरवठा करावा अशी मागणी केली आहे.

गाळमुक्त धरण योजना राबवा

मागील सुमारे एक दशकापासून महाड तालुक्यातील धरण क्षेत्र लगत असलेल्या ग्रामस्थांकडून धरणात जमा झालेला मोठा गाळ लक्षात घेऊन पाणीसाठा कमी शिल्लक राहत असल्याने एप्रिल महिन्यापासूनच या परिसरातून तीव्र पाणीटंचाई भेडसावू लागली आहे.

ही मोठी समस्या लक्षात घेऊन मागील दहा वर्षापासून नागरिकांकडून शासनाला या धरण क्षेत्रातील अतिरिक्त जमा झालेला गाळ काढण्याची मागणी केली जात आहे गाळ काढल्यास धरणात मोठ्या प्रमाणात पाणी ची साठवण होईल व बारामहिने पाणी पुरवठा सुरळीत होईल अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT