रोह्यात राष्ट्रवादी विरुद्ध शिंदे शिवसेना लढत pudhari photo
रायगड

Raigad ZP PS Election : उरणमध्ये बहुरंगी लढतीने निवडणूक चुरशीची

तालुक्यात जि.प.13 आणि पं.स.मध्ये 21 उमेदवारांची माघार,आता प्रचाराला जोर

पुढारी वृत्तसेवा

उरण : रायगड जिल्हा परिषद आणि उरण पंचायत समितीच्या 2026 मधील सार्वत्रिक निवडणुकीचे चित्र आता स्पष्ट झाले असून, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध केली आहे. यामध्ये विविध राजकीय पक्षांच्या उमेदवारांना त्यांच्या अधिकृत चिन्हांचे वाटप करण्यात आले असून आता प्रचाराचा धुरळा उडणार आहे.जि.प.च्या 13 उमेदवार,पंचायत समितीसाठी 21 उमेदवारांनी माघारघेतली आहे.तरीही तालुक्यात बहुरंगी लढतीने निवडणूक चुरशीची होणार आहे.

पंचायत समितीचे उमेदवार

पंचायत समितीसाठी देखील प्रत्येक गणात अटीतटीची लढत पाहायला मिळत आहे. पंचायत समितीसाठी भेंडखळ गणातून भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) कडून कुंदा भुषण पाटील , भाजपाकडून मिलिंद पाटील , शिवसेना (उबाठा) कडून दिपक भोईर, शिवसेनेकडून (शिंदे गट) भावेश भोईर असे एकूण पाच उमेदवार रिंगणात आहेत. नवघर गणातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ॲड. रजनीकांत गणेश पाटील , भाजपाचे हरेश भोईर आणि शिवसेना (उबाठा) चे परेश ठाकूर यांच्यात लढत होईल. जासई गणातून भाजपाच्या मनिषा घरत आणि शेकापच्या निर्मला घरत यांच्यात थेट लढत रंगणार आहे.

चिर्ले गणातून जोत्स्ना अजित पाटील (भाजपा) आणि प्रियंका दिपक मढवी यांच्यात थेट लढत होणार आहे. केगांव गणातून राष्ट्रवादीचे परिक्षीत ठाकूर, भाजपाचे राजेंद्र ठाकूर आणि शेकापचे महेश म्हात्रे निवडणूक रिंगणात आहेत. चाणजे गणातून भाजपाचे कैलास भोईर, शिवसेनेचे अक्षय म्हात्रे आणि शेकापचे ॲड. सागर कडू यांच्यात सामना होणार आहे.

चिरनेर गणातून महाविकास आघाडीच्या कविता पाटील आणि भाजपाच्या साक्षी पाटील यांच्यात लढत होईल तर आवरे गणातून भाजपाच्या समिधा म्हात्रे, शेकाप आघाडीच्या प्रारंभी गावंड आणि मनसेच्या सुषमा गावंड यांच्यात तिरंगी लढत होणार आहे.

उरण तालुक्यात महाविकास आघाडी, महायुती आणि शेकाप अशा विविध पक्षांच्या उपस्थितीमुळे यंदाची निवडणूक अत्यंत रंगतदार होणार असल्याचे चिन्हांच्या वाटपानंतर स्पष्ट झाले आहे. सर्वच उमेदवारांनी आता गावागावात प्रचाराला सुरुवात केली आहे.पुढील आठवडाभर प्रचाराचा धडाका सुरु राहणार आहे.

जि.प.गटातील उमेदवार

1) नवघर गटातून शिवसेना ( ठाकरे) पक्षाच्या प्रेरणा कुणाल पाटील, भाजप प्रभावती राजाराम भोईर आणि वंचित बहुजन आघाडीच्या सोनाली तुषार गायकवाड

2) जासई गटातून भाजपाचे जे.डी. जोशी, काँग्रेसचे डॉ. मनिष अनंत पाटील आणि अपक्ष संतोष दत्तु भालेकर

3) चाणजे गटातून शिवसेना (ठाकरे) ः सिद्धी सागर कडू , भाजपा ः रिना जितेंद्र घरत, आम आदमी पार्टीच्या मालती संतोष भगत

4) चिरनेर गटातून काँग्रेसचे ॲड. अविनाश विजय ठाकूर आणि भाजपाचे देवेंद्र विनायक पाटील यांच्यासह संतोष भगत, अविनाश पाटील आणि रत्नाकर म्हात्रे हे तीन अपक्ष

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT