रायगड : रायगड जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्ये अनुसूचित जाती/जमाती, नागरिक मागास वर्ग आणि स्त्रियांसाठी आरक्षित जागा निश्चित करण्यासाठी सोडत (ड्रा) पद्धतीने प्रक्रिया आयोजित करण्यात आली आहे. महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या अधिनियम, १९६१ मधील तरतुदीनुसार आणि महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या (जागा आरक्षणासबंधीची पद्धत व चक्रानुक्रम) नियम, २०२५ नुसार ही कार्यवाही केली जाईल.
जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये ही प्रक्रिया एकाच दिवशी (१३ ऑक्टोबर २०२५ रोजी) सकाळी ११:०० वाजता आयोजित करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेसाठीची बैठक मात्र दुपारी १२ वाजता सुरू होईल.
* जिल्हा परिषद रायगड: नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, रायगड (दुपारी १२ वाजता)
* पनवेल: आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फळके नाट्यगृह, पनवेल
* कर्जत: प्रशासकीय भवन, तहसलिदार कार्यालय, कर्जत
* खालापूर: छत्रपती शिवाजी महाराज सभागृह, पंचायत समिती, खालापूर
* सुधागड: श्री बल्लाळेश्वर देवस्थान पाली भक्त निवास, क्र.१ता सभागृह जि.रायगड
* पेण: उपविभागीय अधिकारी कार्यालय, पेण
* उरण: पंचायत समिती सभागृह, उरण
* अलिबाग: नगरपरिषद अलिबाग सभागृह, अलिबाग
* मुरुड: महाराष्ट्र भूषण डॉ.दि.शि. नानासाहेब धर्माधिकारी सभागृह, पंचायत समिती, मुरुड
* रोहा: ज्येष्ठ नागरिक सभागृह नगर परिषद, रोहा
* तळा: डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी सभागृह, पंचायत समिती, तळा
* माणगाव: मध्यवर्ती प्रशासकीय भवन तहसलिदार कार्यालय, माणगाव
* म्हसळा: पंचायत समिती सभागृह, पंचायत समिती, म्हसळा
* श्रीवर्धन: मध्यवर्ती प्रशासकीय भवन, पहिला मजला तहसलिदार कार्यालय, श्रीवर्धन
* महाड: बहुउद्देशीय हॉल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, महाड
* पोलादपूर: कॅप्टन विक्रमराव मोरे सभागृह, पोलादपूर
जिल्हा परिषदेची बैठक वगळता, उर्वरित सर्व ठिकाणच्या बैठका सकाळी ११:०० वाजता सुरू होतील.
या संदर्भातील कार्यवाही सोडत पद्धतीने करण्यात येणार असून, जिल्हा परिषद किंवा पंचायत समितीतील ज्या रहिवाशांना या सभेस हजर राहण्याची इच्छा आहे, त्यांनी वरील नमूद केलेल्या ठिकाणी व वेळी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी केले आहे.