Zilla Parishad Election File Photo
रायगड

Raigad Zilla Parishad Election: रायगड जि.प.–पं.स. निवडणुकीची रणधुमाळी सुरू; 16 जानेवारीपासून उमेदवारी अर्ज दाखल

59 गट व 118 गणांसाठी 5 फेब्रुवारीला मतदान; तीन वर्षांच्या प्रशासकीय राजवटीनंतर नवे कारभारी ठरणार

पुढारी वृत्तसेवा

रायगड : रायगड जिल्हा परिषदेच्या 59 आणि 14 पंचायत समित्यांच्या 118 जागांसाठी शुक्रवारी ( 16 जानेवारी) उमेदवारी अर्ज भरण्यास प्रारंभ होत आहेत. या निवडणुकीत कुणाला कुणाला उमेदवारी मिळते याकडे राजकीय पक्षांचे लक्ष लागलेले आहे.

रायगड जिल्हा परिषदेच्या 59 गटांसाठी आणि 14 पंचायत समित्यांच्या 118 गणांसाठी येत्या 5 फेब्रुवारीला मतदानघेण्यात येणार आहे. यामुळे पुन्हा एकदा रायगडात निवडणुकीची लगीनघाई पहावयास मिळणार आहे. यामुळे राजकीय पक्षाच्या नेते, कार्यकर्ते, इच्छुक उमेदवार यांना पुन्हाएकदा नव्या दमाने,जोमाने जि.प.पं.सं. निवडणुकीसाठी सज्ज व्हावे लागणार आहे.

रायगड जि.प.चे 59 गट आहेत.तर 14 पंचायत समित्यांचे 118 गण आहेत.यामध्ये ही निवडणूक प्रक्रिया होणार आहे. रायगड जिल्हा परिषदेची यापूर्वी 2017 मध्ये सार्वत्रिक निवडणूक झाली होती.या निवडणुकीची मुदत 2022 मध्ये संपुष्टात आला.त्यानंतर तब्बल तीन वर्षे रायगड जिल्हा परिषदेवर प्रशासकीय राजवट कार्यरत आहे.

आता निवडणुका होतअसल्याने 5 फेब्रुवारीनंतर होणाऱ्या मतदानानंतर जिल्हा परिषदेला नवे कारभारी मिळणार आहेत.दरम्यान, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी सर्व तहसील कार्यालयामध्ये संबधित निवडणूक निर्णयअधिकाऱ्यांनी बैठक घेऊन निवडणुकीचा आढावा घेतला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT