Voter Verification Raigad  Pudhari File Photo
रायगड

Voter Verification Raigad | विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेअंतर्गत रायगड जिल्ह्यातील मतदार पडताळणीला वेग

मतदान केंद्रांवर मतदारांची पडताळणी आणि मॅपिंगचे काम वेगाने सुरू

पुढारी वृत्तसेवा

Voter Verification Raigad

अलिबाग : भारत निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेअंतर्गत रायगड जिल्ह्यात मतदार यादी अधिक अचूक आणि अद्ययावत करण्याचे काम सुरू आहे. जिल्ह्यातील मतदान केंद्रांवर मतदारांची पडताळणी आणि मॅपिंगचे काम वेगाने सुरू असल्याची माहिती जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

रायगड जिल्ह्यात एकूण २ हजार ७९० मतदान केंद्रे असून प्रत्येक केंद्रावर एक बीएलओ (बूथ लेव्हल ऑफिसर) नियुक्त करण्यात आला आहे. विधानसभा मतदारसंघनिहाय पाहता श्रीवर्धन मतदारसंघात सर्वाधिक काम पूर्ण झाले आहे. श्रीवर्धनमध्ये एकूण २ लाख ६५ हजार १०० मतदारांपैकी २ लाख ३० हजार ५६१ मतदारांचे मॅपिंग करण्यात आले आहे. त्याची टक्केवारी ८६.९७ इतकी आहे. श्रीवर्धननंतर पेण, महाड, अलिबाग, कर्जत आणि उरण या मतदारसंघांचा क्रम लागतो.

तर पनवेल विधानसभा मतदारसंघात मॅपिंगचे प्रमाण सर्वात कमी आहे. पनवेलमध्ये एकूण ६ लाख ८४ हजार ५३ मतदार असून त्यापैकी २ लाख ८ हजार २७४ मतदारांचे मॅपिंग करण्यात आले आहे. ही टक्केवारी ३०.४५ इतकी आहे. त्यामुळे या भागात मॅपिंगचे काम अधिक वेगाने करण्यावर प्रशासन भर देत आहे.

मतदार यादीतील माहिती अचूक राहावी आणि प्रत्येक पात्र नागरिकाचा मतदानाचा हक्क सुरक्षित राहावा यासाठी ही मोहीम राबविण्यात येत असल्याचे प्रशासनाने सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT