रायगड : रायगड जिल्ह्यातील पाली येथील उत्कर्श राजेश मपारा हा विद्यार्थी दुबईमध्ये अडकला असल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांनी कळवली आहे. दुबईमध्ये सद्यस्थितीत तो सुरक्षीत आहे. त्यास मायदेशी येण्याकरिता शासन स्तरावरुन उपाययोजना करण्यात येत असल्याची माहिती रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दैनिक पुढारी शी बोलताना दिली आहे.
परदेशी जाणाऱ्या नागरिकांची नोंद ठेवणारी जिल्हा स्रावर यंत्रणा नाही
परदेशात जाणाऱ्या वा गेलेल्या कोणत्याही नागरिकाची नोंद जिल्हा स्तरावर ठेवण्याची यंत्रणा आपल्याकडे नाही. परिणामी परिणामी आखाती देशात वा अन्य देशात अडकलेल्या वा अडचणीत असलेल्या रायगड मधील नागरिकांच्या येथील नातेवाईकांनी जिल्हा प्रशासनाच्या वा शासनाच्या हेल्पलाईनवर कळवल्या शिवाय आपल्याला माहिती उपलब्ध होत नसल्याचेही संदेश शिर्के यांनी पूढे सांगीतले.
दरम्यान मध्यपूर्व व परिसरातील काही देशांमध्ये निर्माण झालेल्या तणावपूर्ण प्रादेशिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारच्या संबंधित दूतावासांनी तेथे वास्तव्यास असलेल्या भारतीय नागरिकांसाठी सुरक्षा ॲडव्हायझरी जारी केली आहे अशी माहिती रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिली आहे.
दरम्यान जिल्ह्यातून अन्य कुणाही नातेवाईकांकडून आपले नातेवाईक दुबई वा आखाती देशात अडकले असल्या बाबत वा त्यांना काही मदत पाहीजे असल्या बाबत फोन वा सूचना जिल्हा प्रशासनास प्राप्त झालेली नाही. परिणामी सद्यस्थितीत उत्कर्श राजेश मपारा हा विद्यार्थी दुबईत अडकला असल्याची माहिती उपलब्ध आहे.त्यास मायदेशी आणण्याकरिता करिता केंद्र व राज्य सरकारच्या स्तरावरुन व्यवस्था करण्यात येत असल्याची माहिती रायगड जिल्हा आपत्ती निवारण प्राधिकरणाचे मुख्य कार्यकार्यकारी अधिकारी तथा निवासी उप जिल्हाधिकारी संदेश शिर्के यांनी दिली आहे.