railway  pudhari photo
रायगड

crime news: प्रचार साहित्य चिकटवल्याप्रकरणी “बंगाली बाबा”ला अटक; आरपीएफ पथकाने केली कारवाई

मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे आरपीएफ पथकाने रेल्वे रेक आणि परिसरात प्रचार साहित्य चिकटवल्याबद्दल “बंगाली बाबा” ला अटक केली.

Anirudha Sankpal

रोहे : प्रतिनिधी

मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाच्या वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे च्या समन्वित आरपीएफ पथकाने १७.०२.२०२६ रोजी केलेल्या संयुक्त कारवाईत "बंगाली बाबा" म्हणून ओळख असलेल्या एका व्यक्तीला रेल्वे रेकमध्ये आणि रेल्वे परिसरात बेकायदेशीरपणे प्रचार साहित्य चिकटवणे आणि वितरित केल्याबद्दल अटक करण्यात यश मिळवले आहे.

विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या गुप्त माहितीवरुन, रे रोड परिसरात एक बनावट बाबा कार्यरत असल्याबद्दलचे कळताच, रे रोड येथील दारूखाना येथील मीरा अली दर्गा येथे संयुक्त छापा टाकण्यात आला.

छाप्यादरम्यान, मोहम्मद नझीर अंदारी नावाच्या एका आरोपीला अटक करण्यात आली आणि रेल्वे रेक आणि परिसरात जाहिराती प्रसिद्धीसाठी बनवलेले सुमारे १५,००० छापील पोस्टर्स त्याच्या ताब्यातून जप्त करण्यात आले. चौकशीनंतर, रेल्वे प्रशासनाची कोणतीही परवानगी न घेता आरोपीने व्यावसायिक उपक्रम राबवण्यासाठी आणि रेल्वेच्या कोचसह रेल्वे परिसराचा प्रचारासाठी वापर करत असल्याचे मान्य केले. त्यानुसार, कलम १४४, १४५(ब), १४७ आणि १६६ अंतर्गत सीआर क्रमांक १०४/२०२६ नुसार वडाळा येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपीच्या सखोल चौकशीत इतर संशयितांचा रेल्वे डब्यांमध्ये प्रचार साहित्य छापण्यात आणि चिकटवण्यात सहभाग असल्याचे उघडकीस आले. संबंधित सहकाऱ्यांची ओळख पटवून त्यांना अटक करण्यासाठी तपास सुरू आहे. पोस्टर्स चिटकवणाऱ्या संशयित प्रिंटीग एजन्सी आणि व्यक्तींशी संबंधीत आर्थिक व्यवहारांचेही तपशीलवार विश्लषण केले जात आहे.

अनधिकृत जाहिरात करणे, रेल्वे मालमत्तेचे विद्रूपीकरण करणे आणि त्याचा गैरवापर करणे हे रेल्वे कायद्यांतर्गत दंडनीय गुन्हे आहेत, असे मध्य रेल्वेकडून वारंवार सांगण्यात येते. अशा बेकायदेशीर कृत्यांमध्ये सहभागी असलेल्या व्यक्ती आणि गटांवर कठोर कारवाई केली जाईल.

मध्य रेल्वे सामान्य नागरिकांना आवाहन करते की, रेल्वे परिसर आणि रेल्वे गाड्यांच्या आत/ बाहेर तसेच रेल्वे परिसरात अनधिकृत सूचना/ पोस्टर्स चिकटवू किंवा प्रदर्शित करु नये. जाहिरातींमध्ये आवड असलेल्यांनी परवानगीसाठी मध्य रेल्वेच्या वाणिज्य विभागाशी संपर्क साधावा.

मध्य रेल्वे रेल्वे परिसर स्वच्छ, सुरक्षित आणि प्रवाशांसाठी अनुकूल ठेवण्यासाठी कटीबद्ध आहे. यामुळे स्वच्छ, शिस्तबद्ध आणि नुकसानमुक्त रेल्वे परिसरासाठी नागरिकांचे सहकार्य अपेक्षित आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT