Raigad Rope - way stop : रायगड रोपवे 15 नोव्हेंबर पर्यंत राहणार बंद!  
रायगड

Raigad Ropeway stop : रायगड रोपवे 15 नोव्हेंबर पर्यंत राहणार बंद! शिवभक्तांची होणार गैरसोय

रोपवे प्रशासनाची माहिती, देखभाल व दुरुस्तीची कामे करण्यासाठी निर्णय

पुढारी वृत्तसेवा

नाते : रायगड रोपवे ची हंगामपूर्व देखभाल , दुरुस्ती व तांत्रिक तपासणीची कामे करण्यात येत आहेत त्यामुळे रायगड रोपवे ची सेवा दिनांक 21 सप्टेंबर 2026 ते 15 नोव्हेंबर 2026 पर्यंत तात्पुरती बंद राहील अशी माहिती रायगड रोपवे प्रशासनाकडून प्रसिद्धीसाठी देण्यात आली आहे.

सदर देखभाल व दुरुस्तीची कामे तसेच आवश्यक सुरक्षा तपासण्या पूर्ण करून रोप वेची सेवा दिनांक 16 नोव्हेंबर 2026 पासून पुन्हा सुरू करण्याचे नियोजन केले आहे.

कामे पूर्ण झाल्यानंतर व सेवा पूर्ववत सुरू करण्याबाबत आपणास कळविण्यात येईल असे प्रशासनाने स्पष्ट केले असून या दरम्यान शिवभक्तांच्या होणाऱ्या गैरसोयीबद्दल रायगड रोपवे प्रशासनाच्या वतीने राजेंद्र खातू यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT