Road Accident File Photo
रायगड

Raigad Road Accidents 2025: रायगडचे रस्ते ठरतायत मृत्यूचा सापळा; वर्षभरात 627 अपघातांत 258 जणांचा बळी

वाहनांची वाढती वर्दळ, खड्डे व धोकादायक वळणांचा फटका; दररोज 2–3 अपघातांची नोंद

पुढारी वृत्तसेवा

अलिबाग : वाहनांची वाढलेली वर्दळ, धोकादायक वळणे, रस्त्यांची झालेली दुरावस्था, भरधाव वाहने यामुळे रायगड जिल्ह्यातील रस्ते मृत्यूचा सापळा बनली आहेत. रायगड जिल्हा पोलिस दूरक्षेत्र हद्दीत दिवसाला जवळपास 2 ते 3 अपघात होत आहेत. जानेवारी ते डिसेंबर 2025 कालावधीत रायगड पोलीस दुरक्षेत्र हद्दीत 627 अपघात झाले असून, या अपघातांमध्ये 258 जणांचा मृत्यू झाला असून, 780 जण जखमी झाले आहेत.

रस्ते अपघात कमी करण्यासाठी वाहतूक विभागामार्फत अनेक प्रयत्न करण्यात येत आहेत. चालकांनी वाहन सावकाश चालवावे यासाठी ठिकठिकाणी पोस्टर लावण्यात आले आहेत. प्रमुख नाक्यांवर वाहतूक पोलिस वाहनचालकांची तपासणी करतात. वाहनचालकांमध्ये जागृती करण्यात येत आहे.

वाहतूक नियम मोडणाऱ्या वाहनचालकांवर धडक कारवाई हाती घेतली आहे. एवढे प्रयत्न केल्यानंतर अपघातांची संख्या कमी करण्यात यश मिळाले आले तरी जिल्ह्यात आजही मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत. मागील वर्षभरात जिल्ह्यात 627 अपघात झाले असून, यामध्ये 258 जणांचा मृत्यू झाला आहे.

अपघातांची प्रमुख कारणे

महामार्गांची संपूर्ण माहिती नसताना वेगाने वाहन चालविणे.

रस्त्यालगत इंडिकेटर न लावता थांबलेली वाहने.

रस्त्यावरील खड्डे चुकविण्याचा प्रयत्न करणे.

कोणतिही पूर्वकल्पना न देता वाहन दुसऱ्या बाजूला नेणे.

मद्य पिऊन वाहन चालविणे

धोकादायक वळणे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT