Mumbai Rain Pudhari
रायगड

Raigad Rain Alert: रायगडला आज ऑरेंज अलर्ट

गेल्या चोवीस तासात रायगड जिल्ह्यात २४.१ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.

पुढारी वृत्तसेवा

अलिबाग: रायगड जिल्ह्यात सध्या पावसाचा जोर कमी आहे. अधूनमधून पाऊस होत आहे. मात्र पुढील दोन दिवसात पावसाचा जोर वाढणार आहे. ५ आॅगस्टसाठी आॅरेंज अलर्ट तर ६ आॅगस्टसाठी यलो अलर्ट हवामान विभागाने जाहीर केला आहे. तर गेल्या चोवीस तासात रायगड जिल्ह्यात २४.१ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.

रायगड जिल्हयात गेल्या तीन दिवसांपासून पावसाचा पावसाचा जोर कमी झाला आहे. जिल्हयात काही भागात पावसाच्या मध्यम स्वरुपाच्या सरी होत आहेत.

मंगळवारी सकाळी आठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासात अलिबाग तालुक्यात ८.८ मि.मी., पनवेल- १८.४, कर्जत- ३६.८, खालापूर- ३१.५, उरण- ७.७, सुधागड- ३८.४, पेण- १५.७, महाड- २७.८, माणगाव- ४४.१, रोहा- ४४.६, पाेलादपूर- २४, मुरुड- ४.८, श्रीवर्धन- ४, म्हसळा- ९ आणि तळा तालुक्यात ३३.५ मि.मी. पाऊस झाला आहे.

चाेवीस तासात २४.१ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान आगामी दोन दिवसात पावसाचा जोर वाढणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT