रायगड पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीवर पावसाचे पाणी pudhari photo
रायगड

Raigad Police Recruitment | रायगड पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीवर पावसाचे पाणी

पुढारी वृत्तसेवा

रायगड : अलिबाग तालुक्यात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे रायगड जिल्हा पोलीस भरतीतील मैदानी चाचणी स्थगित करण्यात आली आहे. सोमवारी (8 जुलै) उपस्थित असलेल्या उमेदवारांची कागदपत्र तपासणी करुन त्यांना पुढील तारिख देण्यात देण्यात आली आहे. तर पुढील दोन दिवसांच्या मैदानी चाचणीतील उमेदवारांना पुढील तारखा देण्यात आल्या आहेत.

रायगड पोलीस दलातील भरती प्रक्रिया 21 जूनपासून सुरू झाली आहे. रायगड विभागातील 21 डिसेंबर 2023 पर्यंत रिक्त असलेल्या 422 पदांसाठी ही भरती प्रक्रिया होत आहे. 422 पदांसाठी 31 हजार 63 उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. 391 पोलिस शिपाई पदासाठी 23 हजार 973 पुरुष तर 4 हजार 860 महिला उमेदवारांनी (यात 9 बँड्समन पदासाठी 1383पुरुष तर 39 महिला उमेदवार) असे 28 हजार 833 , 31 चालक शिपाई पदांसाठी 2 हजार 96 पुरुष तर 134 महीला असे एकूण 2 हजार 230 उमेदवाराचे अर्ज आले आहेत. या भरतीवर पावसाचे सावट होते. सुरुवातीला जिल्ह्यात पावसाचा जोर होता. मात्र गेली त्यानंतर पावसाचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे पोलीस भरती प्रक्रिया सुरु होती. मात्र 7 व 8 जुलै रोजी पावसाचा जोर वाढला. विशेष करून अलिबाग तालुक्यात अधिक पाऊस झाला आहे. त्याचा परिणाम भरतीच्या मैदानी चाचणीवर झाला आहे.

पुढची तारीख 13 जुलै

सोमवारी पावसामुळे मैदानी चाचणी रद्द करण्यात आली. मैदानी चाचणीसाठी आलेल्या उमेदवारांची कागदपत्र तपासणी करुन त्यांना 13 जुलै ही तारिख देण्यात आली आहे. जिल्हयात सध्या जोरदार पाऊस सुरु असल्याने उमेदवारांना मैदानी चाचणीकरीता पोहचणे अडचणीचे तसेच जिकरीचे होत आहे. त्यामुळे 9 जुलै व 10 जुलै रोजी ज्या उमेदवारांची मैदानी चाचणी आहे त्यांची मैदानी चाचणी अनुक्रमे 15 व 16 जुलै रोजी होणार असल्याचे रायगड पोलीस विभागाकडून कळविण्यात आले आहे.नैसर्गिक आपत्तीमुळे परीक्षार्थी मात्र कमालीचे हैराण झाले आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT