illegal liquor seized pudhari photo
रायगड

Liquor stock seized raigad : पोलादपूर तालुक्यात 3 लाख 25 हजार रुपयांची गोवा बनावटीची दारू जप्त

राज्य उत्पादन शुल्क खात्याच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी गोवा बनावटीच्या विदेशी मुद्देमाल जप्त केला

पुढारी वृत्तसेवा

पोलादपूर : तालुक्यातील कापडे बुद्रुक व दिविल गावात राज्य उत्पादन शुल्क सह महाड येथील भरारी पथकाने मारलेल्या छाप्यात सुमारे सव्वातीन लाख रुपयांची गोवा बनावटीची दारू जप्त केल्या. 2 आरोप च्या मुसक्या आवळल्या आहेत तर 1 आरोपी पळून जाण्याचा यशस्वी ठरला सदरची कारवाई शुक्रवारी 7 ऑगस्ट 26 रोजी करण्यात आली

राज्य उत्पादन शुल्क खात्याच्या आयुक्त राजेश देशमुख यांच्या आदेशान्वये तसेच संचालक प्रसाद सुर्वे व विभागीय उपायुक्त प्रदीप पवार आणि रायगडचे राज्य उत्पादन शुल्क खात्याचे अधीक्षक आदित्य पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य उत्पादन शुल्क त्याचे महाडचे निरीक्षक व अलिबागचे निरीक्षक व अलिबाग येथील भरारी पथक यांच्या संयुक्त मोहिमेत पोलादपूर तालुक्यातील दिविल व कापडे बुद्रुक गावात राज्य उत्पादन शुल्क खात्याच्या अधिकाऱ्यांनी कारवाई केली. विदेशी मद्याचे २४ बॉक्स व देशी मद्याचे गोवा बनावटीचे १५ बॉक्स जप्त केले. अंदाजे ३ लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केलेला मुद्देमाल राज्य उत्पादन शुल्क खात्याच्या महाड येथील कार्यालयात जमा करण्यात आला आहे.

राज्य उत्पादन शुल्क खात्याच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी गोवा बनावटीच्या विदेशी मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत आरोपी विकास कदम व योगेश चीनकर यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले. एक आरोपी अद्याप फरारी असल्याचे महाड येथील कार्यालयात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. या कारवाईत महाडचे राज्य उत्पादन शुल्क खात्याचे निरीक्षक सतीश गावडे, संतोष पिसाळ, बालाजी कांबळे, निमेश नाईक, मनोज गायकवाड, ज्ञानेश्वर पोटे, आशिष कांबळे, सुनील घन, प्रशांत नवले, रंजीत माकोडे , रचना मोहिते सह रिकेश घुले, शांतिनाथ पाटील आदी मोहिमेत सहभागी झाले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT