panvel municipal corporation Pudhari
रायगड

Panvel Municipal Corporation | पनवेल महापालिका कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड; सानुग्रह अनुदानाला मंजुरी

महापालिका कर्मचाऱ्यांना प्रत्येकी ३५ हजार; शिक्षकांना १५ हजार, तर आशा वर्कर्ससह अन्य घटकांना १० हजार रुपये

पुढारी वृत्तसेवा

PMC Employees Sanugrah Anudan Approved

पनवेल : पनवेल महानगरपालिकेतील अधिकारी, कर्मचारी आणि विविध योजनांतर्गत कार्यरत कर्मचाऱ्यांची दिवाळी यंदा गोड होणार आहे. दिवाळीनिमित्त देण्यात येणाऱ्या सानुग्रह अनुदानाच्या प्रस्तावाला महापालिकेच्या महासभेत मंजुरी देण्यात आली आहे. यामुळे महापालिकेच्या आस्थापनेवरील कर्मचाऱ्यांसह शिक्षक, आशा वर्कर्स आणि विविध योजनांमध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांना सणापूर्वी आर्थिक दिलासा मिळणार आहे.

महापालिकेच्या आस्थापनेवरील ८३७ कर्मचाऱ्यांना प्रत्येकी ३५ हजार रुपये सानुग्रह अनुदान दिले जाणार आहे. त्यासाठी संबंधित प्रस्तावाला महासभेने हिरवा कंदील दाखवला आहे. तसेच महापालिकेतील ६८ शिक्षकांना प्रत्येकी १५ हजार रुपये देण्यात येणार आहेत.

राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानांतर्गत (एनयूएलएम) कार्यरत दोन कर्मचारी, २२९ आशा वर्कर्स, ५८ एनएचएलयूएम कर्मचारी आणि प्रधानमंत्री रोजगार योजनेतील (पीएमईवाय) दोन कर्मचाऱ्यांना प्रत्येकी १० हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्यासही मंजुरी मिळाली आहे.

या निर्णयाचा एकूण १ हजार १९६ कर्मचाऱ्यांना लाभ होणार आहे. दिवाळीच्या तोंडावर सानुग्रह अनुदान मिळणार असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. सणासुदीच्या काळात घरखर्च, खरेदी आणि अन्य गरजा भागवण्यासाठी या रकमेचा उपयोग होणार आहे. महासभेच्या मंजुरीमुळे आता संबंधित कर्मचाऱ्यांना अनुदान वितरित करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT