रायगडात भाताला 2 हजार 369 रुपये दर pudhari photo
रायगड

Raigad paddy price : रायगडात भाताला 2 हजार 369 रुपये दर

जिल्ह्यात 44 केेंद्रावर होणार भातखरेदी ः जिल्हाधिकारी जावळे

पुढारी वृत्तसेवा

रायगड : किमान आधारभूत किंमत धान खरेदी योजनेंतर्गत दि.महाराष्ट्र स्टेट को-ऑप मार्केटिंग फेडरेशन मुंबई यांच्या मार्फत जिल्हा पणन अधिकारी, रायगड यांच्या अखत्यारीत असलेल्या धानखरेदीदार संस्थांमार्फत 46 खरेदी केंद्रावर खरीप व रब्बी पणन हंगाम 2025-2026 करिता धानाची (भाताची) खरेदी करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिली आहे.

यासाठी सरकारने भाताला 2 हजार 369 रुपये प्रति क्विंटल दर जाहीर केला आहे. शासन निर्णयान्वये भात खरेदीचा धान-खरीप पणन हंगाम कालावधी दि.03 नोव्हेंबर 2025 ते दि.31 मार्च 2026, तर भरडधान्य खरीप पणन हंगाम कालावधी दि.01 डिसेंबर 2024 ते दि.28 फेब्रुवारी 2026 असा असेल. तर रब्बी पणन हंगाम केंद्र शासनाकडून प्राप्त सूचनांनुसार राहील.

धानाची खरेदी ही ऑनलाईन पद्धतीने होणार असल्याने संबधित शेतकऱ्यांची नोंदणी करणे आवश्यक राहील. याकरिता खरेदी केंद्रावर भात विक्रीकरिता आणताना प्रत्येक शेतकऱ्यांनी सोबत आपल्या आधारकार्डाची तसेच बँकेच्या पासबुक आणणे आवश्यक आहे.

तसेच रोज सायंकाळी खरेदी केंद्र बंद झाल्यानंतर खरेदी केंद्रांवर आणलेले, परंतु खरेदी न झालेले धान/ भरडधान्य सांभाळण्याची जबाबदारी संबधित शेतकऱ्यांचीच राहील. आधारभूत किमत योजनेंतर्गत केंद्र शासनाने विहित केलेल्या बसणारे दर्जाचेच धान | भरडधान्य खरेदी करण्यात येईल .

भाताच्या आधारभूत किंमती पुढीलप्रमाणे

भात सर्वसाधारण-2 हजार 369 रुपये प्रति क्विंटल व शेतकऱ्यांना 2 हजार 369 रूपये प्रति क्विंटल रक्कम अदा करण्यात येईल. भात (अ ग्रेड)- 2 हजार 389 प्रति क्विंटल व शेतकऱ्यांना 2 हजार 389 रूपये प्रति क्विंटल रक्कम अदा करण्यात येईल. भरडधान्य-ज्वारी (संकरित)- 3 हजार 699 प्रति क्विंटल व शेतकऱ्यांना 3 हजार 699, ज्वारी (मालदांडी)- 3 हजार 749 प्रति क्विंटल व शेतकऱ्यांना 3 हजार 749, बाजरी- 2 हजार 775 प्रति क्विंटल व शेतकऱ्यांना 2 हजार 775, मका- 2 हजार 400 प्रति क्विंटल व शेतकऱ्यांना 2 हजार 400, रागी- 4 हजार 886 प्रति क्विंटल व शेतकऱ्यांना 4 हजार 886.

खरेदी केलेल्या धान्‌‍/भरडधान्याची देय रक्कम शेतकऱ्यांना अदा करताना ऑनलाईन पध्दतीने प्रदान करण्याबाबत शासनाचे निर्देश आहेत. ही रक्कम कोणत्याही परिस्थितीत धान/भरडधान्य खरेदी केलेल्या दिवसापासून पुढील 2 दिवसापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली पाहिजे.भात खरेदी केंद्राची ठिकाणे व त्यास जोडलेली गावे यांची माहिती जिल्हा पणन अधिकारी रायगड संबंधित तहसिलदार/ गट विकास अधिकारों पंचायत समिती तसेच उप अभिकर्ता म्हणून काम करणाऱ्या सह. संस्था/ खरेदी विक्री संघ/सह.भात गिरणी यांच्याकडे उपलब्ध राहील.
किशन जावळे,जिल्हाधिकारी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT