Kashedi Ghat mystery body
पोलादपूर : मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी घाटात जुन्या महामार्गावर भोगाव गावचे हद्दीत अंदाजे वय ५० ते ५५ वर्ष वयाच्या एका पुरुष जातीचा बेवारस मृतदेह आढळून आला. यामुळे खळबळ उडाली असून हा घातपात की आत्महत्या असा प्रश्न उपस्थित होत आहे.
याबाबत भोगाव पोलीस पाटील शुभांगी उतेकर यांनी या घटनेची माहिती पोलादपूर पोलीस ठाण्याला कळविल्यानंतर पोलादपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद रावडे , पोलीस हवालदार आर के सर्णेकर, संग्राम बामणे,तुषार सुतार, सौरव जाधव यांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा केला असून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस शोध घेत आहेत.