रायगड

Raigad rainfall | उकाड्याने हैराण झालेल्या रायगडकरांना दिलासा; ढगांच्या गडगडाटासह पावसाची दमदार सुरुवात.

शेतकरी वर्ग मध्ये उत्साहाचे वातावरण ; दगड अथवा मातीचा ओसरा खाली येण्याची शक्यता

पुढारी वृत्तसेवा

पोलादपूर : मोसमी पावसाच्या चार महिन्यांतील पहिला पंधरवडा कोरडा गेला. पावसाळा सुरू होऊनही पावसाचेच आगमन होत नसल्याने दक्षिण रायगड वासीयांना पावसाची तीव्र ओढ निर्माण झाली होती. अखेरीस रविवारी दुपारी ढगांच्या गडगडाटासह पावसाळ्यातील पहिल्या सरी बरसल्या असून, नागरिक सुखावले आहेत. तर शेतकरी वर्गात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे पोलादपूर तालुक्यातील काही भागात माती व दगड कोसळण्याच दाट शक्यता निर्माण झाली आहे. याची प्रचिती गाजवणे मार्गवर दगड खाली आल्याने आगामी चार महिने महत्वपूर्ण व कासोटीचे ठरणार आहे

रविवारी दुपारी तीननंतर अचानक आकाश भरून आले, काही वेळातच पावसाला सुरुवात झाली. तसेच ढगांचा गडगडाटही होऊ लागला. संथ लयीत पावसाच्या सरी पडू लागल्या. अचानक आलेल्या पावसामुळे रस्त्यावरील दुचाकी चालकांना भिजावे लागले. काहींना आडोसा घ्यावा लागला. मात्र, त्याचवेळी खूप प्रतीक्षा करून पाऊस आल्याने खूश झालेल्या बच्चेकंपनीने पहिल्या पावसात भिजण्याचा आनंद घेतला.

पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या उष्णतेपासून नागरिकांना आराम मिळाला आहे. शिवाजी पार्क परिसरात अनेक नागरिक पावसाचा आनंद घेताना दिसून आले. काही ठिकाणी नागरिकांनी सकाळच्या पावसात फेरफटका मारत हवामानातील बदलाचा आनंद लुटला.

दरम्यान, हवामान विभागाने पुढील काही दिवस हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे मान्सूनच्या आगमनाची प्रतीक्षा करणाऱ्या नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. पावसाच्या या सुरुवातीमुळे शहरातील तापमानातही घट झाली असून, उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT