श्रीकृष्ण दबाळ
महाड : रायगड जिल्ह्याच्या राजकारणाला पूर्ण कलाटणी देणारी घटना आज महाडमध्ये घडली असून महायुती मधील तीन प्रमुख पक्षांपैकी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट व भारतीय जनता पक्षाने आज महाड येथे झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये या दोन्ही पक्षांच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मा. आमदार अनिकेत तटकरे यांनी आगामी नगर परिषदेच्या निवडणुकांमध्ये आपली युती घोषित केली, या घोषणेचे दूरगामी राजकीय परिणाम घेणाऱ्या काळातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत होतील असे स्पष्ट संकेत या घोषणेने प्राप्त होत आहेत.
माजी आमदार अनिकेत तटकरे यांनी आज स्थानिक राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट व भारतीय जनता पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये या युतीची रायगड जिल्ह्याची घोषणा ऐतिहासिक महाड मधून आपण करीत असल्याचे जाहीर केले.
आगामी महाड नगर परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट 15 तर भारतीय जनता पक्ष पाच जागा लढविणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले महाडची असलेली ऐतिहासिक परंपरा कायम राहावी व येथील जनतेच्या असलेल्या अशा आकांक्षा व सर्वांगीण विकासासाठी महायुती मधील हे दोन्ही पक्ष कटिबद्ध राहतील अशी त्यांनी ग्वाही दिली. पाली बल्लाळेश्वर येथे आशीर्वाद घेऊन आता वीरेश्वर महाराजांचा आशीर्वाद या युतीच्या घोषणेने घेतल्याचे त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले.
महाड नगराच्या विकासाकरता अधिकचा निधी आणण्याचा देखील आपण महायुतीच्या माध्यमातून प्रयत्न करू अशी त्यांनी ग्वाही दिली. या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी नगराध्यक्ष स्नेहल जगताप, भारतीय जनता पक्षाचे बिपिन महामुणकर यांसह राष्ट्रवादी जिल्हा नेते सुभाष शेठ निकम, तालुका अध्यक्ष निलेश महाडिक , ऍड. आदित्य भाटे ,शहराध्यक्ष निलेश तळवटकर, आप्पा सोंडकर, डॉक्टर श्रीमती कुद्रीमोदी, शहराध्यक्ष नमिता दोसी यांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस हनुमंत उर्फ नानासाहेब जगताप, बंटी देशमुख उपस्थित होते.
ऐतिहासिक महाड च्या भवितव्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस व भारतीय जनता पक्ष एकत्रितपणे आगामी निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचे स्पष्ट करून महाडच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीवर जिल्ह्याच्या युतीची घोषणा करण्यासाठी आपण महाडची निवड केल्याचे मा. आ.अनिकेत तटकरे यांनी विनम्रपणे नमूद केले.
या निवडणुका व रायगडच्या पालकमंत्री पदाचा कोणताही संबंध नसल्याचे सांगून निवडणुकीमध्ये समोर जे येतील त्यांच्याशी आम्ही युती मोडून लढणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सगळ्या गोष्टींचा सांगोपांग विचार करूनच ही युती करण्यात आली असून महाडची जनता सुज्ञ आहे असे सांगून या निवडणुकीत 20 व इतर 1 जागांवर महाडकर आम्हाला विजयी करतील असा विश्वास व्यक्त केला.
युतीमध्ये काम करणार असल्याने महाआघाडी मधील कोणत्याही पक्षाबरोबर जाण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. भारतीय जनता पक्षाचे बीपी म्हणून कर यांनी स्थानिक पातळीवर शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसकडून आलेल्या भारतीय जनता पक्षाकडील प्रस्तावावर वरिष्ठ पातळीवरून झालेल्या चर्चेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर युती करण्याचा धोरणात्मक निर्णय घेतल्याचे नमूद केले महाड मधील सर्वसामान्य जनतेला प्रामाणिकपणे कर्तव्यपूर्तीच्या भावनेतून काम करून न्याय देणार असल्याचे सांगून महाडच्या विकासासाठी एकत्रितपणे पारदर्शक कारभार करून महाडमध्ये इतिहास घडवण्याची त्यांनी ग्वाही दिली.
महाडच्या माजी नगराध्यक्ष स्नेहल जगताप यांनी आपल्या नगराध्यक्ष पदाच्या कार्यकाळात घोषित केलेल्या एकूण वचनपूर्तीपैकी 80 टक्के कामे पूर्ण झाल्याचे सांगून कोरोना महामारी मुळे दोन वर्षे विकासात्मक कामाला व खिळ बसली होती, यामुळे राहिलेली 20 टक्के कामे आगामी निवडणुकांकरता घोषित करण्यात आलेल्या वचननाम्यामध्ये कायम केली जातील असे स्पष्ट केले. आपल्या कार्यकाळात महाडकर जनतेने आपल्यावर दाखवलेला विश्वास आगामी काळात देखील नागरिक कायम ठेवतील असे त्यांनी आवर्जून मत व्यक्त केले.