खांब, पुढारी वृत्तसेवा : रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील कोलाड भिरा फाट्यावरील भंगार गोदामाला आज (दि.१०) भीषण आग लागली. आग नियंत्रण करण्यासाठी अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले आहेत. विविध सामाजिक संस्था तसेच रेस्क्यू टीम दाखल झाल्या आहेत. आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहे. घटनास्थळी कोलाड पोलिस दाखल झाले आहेत.
आग नियंत्रण करण्यासाठी अखेर रोहा नगर परिषदेच्या अग्निशमन बंबला पाचारण करावे लागले. विविध सामाजिक संस्था मुंबई - गोवा महामार्गावर काम करत असलेल्या कल्याण टोल कंपनीचे पाण्याचा टँकर तसेच विजय राजिवले यांचा पाण्याचा टँकर आणि स्थानिक एस व्हीआर एस एस रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाली. तीन चार तासांनी ही भीषण आग आटोक्यात आली. या आगीचे कारण समजू शकलेले नाही.
भंगाराच्या साठा गोदामाला आग लागलीची घटना समजतात कोलाड पोलीस निरीक्षक नितीन मोहिते, अंमलदार नरेश पाटील पथकासह घटनास्थळी दाखल झाले.
या घटनेनंतर भर वस्तीच्या ठिकाणी भंगाराचे मोठ मोठे साठे कोणाचे?, यावर नियंत्रण कोणाचे? कोणाचा वरदहस्त आहे? यावर आता प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे. यापूर्वी या मार्गावरील पुई हद्दीत भंगाराला आग लागल्याची घटना घडली होती.