देशासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या पंचवीरांचा ८३ वा स्मृतिदिन साजरा करण्यात आला. Pudhari Photo
रायगड

Mahad Kisan Morcha | स्वातंत्र्य लढ्यातील किसान मोर्चाच्या शौर्यगाथेला महाडमध्ये उजाळा

Raigad News | देशासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या पंचवीरांचा ८३ वा स्मृतिदिन

पुढारी वृत्तसेवा

Mahad Kisan Morcha freedom struggle

महाड : स्वातंत्र्य लढ्यातील ऐतिहासिक किसान मोर्च्याच्या शौर्यगाथेला आज (दि.१०) महाडमध्ये पुन्हा उजाळा मिळाला आहे. १० सप्टेंबर १९४२ रोजी झालेल्या महाड किसान मोर्च्यात देशासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या पंचवीरांना आज ८३ व्या स्मृतिदिनी अभिवादन करण्यात आले.

महाड नगर परिषद, रायगड जिल्हा परिषद आणि स्वातंत्र्य सैनिक उत्तराधिकारी समिती यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमात शहीदांना पुष्पांजली अर्पण करून त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले.या वेळी महाराष्ट्र राज्य मंत्री भरत गोगावले,माजी नगराध्यक्ष स्नेहल जगताप उपस्थित होते.

या वेळी मान्यवरांनी शेतकरी आंदोलनातील या शौर्यपूर्ण पानाची आठवण करून दिली. शेतकरी हक्कांसाठी लढा देणाऱ्या शूरवीरांचे बलिदान भावी पिढ्यांसाठी प्रेरणादायी असल्याचेही ते म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT