रायगड

रायगड : कर्नाळा बँकेच्या व्यवस्थापकाला अटक; सीआयडीची कारवाई

अमृता चौगुले

पनवेल : पुढारी वृत्‍तसेवा : बेकायदेशीर कर्ज वाटप घोटाळाप्रकरणी राज्य गुप्तवार्ता (सीआयडी) विभाग, पुणेच्या पोलिस उपअधीक्षिका मीना जगताप यांनी बँकेच्या तत्कालिन व्यवस्थापक अपर्णा सुहास वडके यांना अटक केली आहे. पनवेल उपजिल्हा सत्र न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

दरम्‍यान, १७ फेब्रुवारी २०२० रोजी साडेपाचशे रुपयांचा घोटाळा झाल्याने शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार विवेकानंद पाटील यांच्या विरोधात पनवेल शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर नवी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे विभागाकडे गुन्हा वर्ग करण्यात आला. गुन्ह्याची व्याप्ती आणि राजकीय पार्श्‍वभूमी पाहून राज्य शासनाच्या गृह खात्याने हा गुन्हा त्यांच्याकडून पुणे येथील राज्य गुप्त वार्ता विभागाकडे वर्ग केला.

आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, तसेच पनवेल संघर्ष समितीने आक्रमक होवून सक्त संचनालय (ईडी) कडे लेखी तक्रार केल्यानंतर घोटाळ्यातील मुख्य आरोपी, विवेकानंद पाटील यांच्यावर १४ जून २०२१ रोजी त्यांच्या निवासस्थानावरून अटकेची कारवाई केली. सुरुवातीला ते मुंबई ऑर्थर रोड कारागृहात आणि आता त्यांचा मुक्काम तळोजे कारागृहात आहे. त्यांचा अटकपूर्व जामीनही ईडी न्यायालयाने काही महिन्यांपूर्वीच फेटाळला आहे.

दरम्यानच्या काळात पनवेल संघर्ष समितीने केलेल्या उठावानंतर १३ ऑगस्ट २०२१ रोजी बँकेचा व्यावसायिक परवाना रद्द केला. आठच दिवसात पाच लाखापर्यंत ठेवी असणार्‍या ठेवीदारांना ३७० कोटी ४६ लाखाचे वाटप करण्यात आले आहेत.

दरम्यान, गेल्या काही महिन्यांपुर्वी मीना जगताप यांनी पनवेल उपजिल्हा सत्र न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले आहे. कर्नाळा बँक घोटाळ्यातील आरोपींना दिलासा मिळाला असे वाटत असताना सीआयडीने अचानक लगाम खेचला आहे. तत्कालिन बँक व्यवस्थापक अपर्णा सुहास वडके यांच्यावर अटकेची कारवाई केल्याने पुन्हा एकदा बँकेचे तथाकथित कर्जदार, संचालकांवर अटकेच्या भीतीचे सावट पसरले आहे.

.हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT