रायगड

Raigad news : इंडो अमाईन्स कंपनी वायुगळती प्रकरणातील मृत वांद्रे कुटुंबीयांना ५० लाखाची मदत

तर पत्नीला महिना11 हजाराची पेन्शन

पुढारी वृत्तसेवा

महाड : औद्योगिक वसाहती मधील इंडो अमाईन्स कंपनी मधील ट्राय फॉसजीन या विषारी वायूचे गळती झाली. या विरल कंपनीमध्ये काम करणाऱ्या कल्पेश वांद्रे याचा विषारी वायूमुळे मृत्यू झाला याबाबत त्याच्या कुटुंबीयांना योग्य ती मदत मिळण्यासाठी कुटूंबियांस बोरगाव ग्रामस्थांनी महाड औद्योगिक वसाहतीतील एमआयडीसी पोलीस ठाण्याला गराडा घातला होता.

जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी आग्रही भूमिका नातेवाईकांची होती. अखेर कंपनी व्यवस्थापनाने वांद्रे कुटुंबीयांना ५० लाखाची मदत व त्यांच्या पत्नीला महिना 11 हजार रुपये पेन्शन, तर मुलांच्या भवितव्यासाठी योग्य तो विचार करण्याचा निर्णय घेतल्यानंतर ग्रामस्थांनी हा निर्णय मान्य केला.

महाड एमआयडीसीतील इंडो अमाईन्स या रसायन कंपनीत शनिवारी १५ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ६ वाजता झालेल्या ट्रायफॉसजीन वायू गळतीच्या घटनेत रविवारी आणखी परप्रांतीय अमित कुमार याचा जागेस बळी गेला. तर बोरगाव गावातील स्थानिक रहिवासी असलेला कल्पेश वांद्रे याचा शासन श्वास गुदमरल्यामुळे त्याला पुढील उपचारासाठी मुंबईमध्ये नेण्यात आले होते मात्र त्याचा मृत्यू झाला. या दुर्घटनेतील मृतांचा आकडा आता दोनवर पोहोचला असून परप्रांतीय कामगार असणाऱ्या अमित कुमार त्याच्या बिहार येथील गावी पाठवण्यात आले आहे.

स्थानिक भूमिपुत्र असलेला बोरगाव गावातील कल्पेश वांद्रे यांच्या मृत्यूमुळे स्थानिक ग्रामस्थ इंडो अमाईन्स कंपनी विरोधात संतप्त झाले. त्यांनी कल्पेश चे पार्थिव स्वीकारण्यास नकार दिला मात्र कंपनीवर स्थानिक ग्रामस्थांनी गर्दी करून वांद्रे कुटुंबीयांना मदत देण्याबाबत आग्रही मागणी केली. संतप्त झालेल्या ग्रामस्थांपुढे कंपनी व्यवस्थापनाने महाड औद्योगिक वसाहतीतील पोलीस ठाण्यामध्ये येऊन ग्रामस्थ व कंपनी व्यवस्थापन यांच्यामध्ये चर्चा झाली.

अखेर वांद्रे कुटुंबीयांना पन्नास लाखाची मदत तर त्याच्या पत्नीला महिना अकरा हजार रुपयाची पेन्शन व मुलांच्या भवितव्यासाठी विचार करण्याचे आश्वासन कंपनी व्यवस्थापनाने औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्यामध्ये झालेल्या चर्चे अंती दिले. काल रात्री उशिरापासून या निर्णयाने निर्माण झालेला तणाव नियंत्रणात ठेवण्यासाठी महाड औद्योगिक वसाहतीमधील पोलीस यंत्रणेने दाखवलेला संयम व दोन्ही बाजूंमधील संवादातून मार्ग काढण्यात फार महत्त्वपूर्ण योगदान दिल्याचे दिसून आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT