Raigad Illegal Schools Pudhari
रायगड

Raigad Illegal Schools: सावधान! रायगडात 35 अनधिकृत शाळा उघडकीस

शिक्षण विभागाचा इशारा; प्रवेश घेण्यापूर्वी मान्यता तपासा, अन्यथा नुकसान

पुढारी वृत्तसेवा

अलिबाग : रायगड जिल्ह्यात अनधिकृतपणे सुरू असलेल्या प्राथमिक शाळांविरोधात जिल्हा परिषद शिक्षण विभागाने कडक पावले उचलली असून, अशा 35 शाळांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या शाळांमध्ये पालकांनी आपल्या पाल्यांचा प्रवेश करू नये, असे स्पष्ट आवाहन शिक्षणाधिकारी (प्राथमिक) ललिता दहीतुले यांनी केले आहे.

एकूणच, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित जपण्यासाठी प्रशासनाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, पालकांनी जागरूक राहून योग्य आणि अधिकृत शाळांची निवड करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

अनेक शाळा इंग्लिश मिडीयम किंवा ‌‘इंटरनॅशनल‌’ नावाखाली कार्यरत असल्याने पालकांना आकर्षण वाटते. मात्र, अशा नावांना भुलून प्रवेश घेतल्यास पुढे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे शाळेची अधिकृत मान्यता तपासूनच प्रवेश घ्यावा.
ललिता दहीतुले, शिक्षणाधिकारी (प्राथमिक)

पनवेल तालुक्यातल सर्वाधिकशाळा

शिक्षण विभागाच्या माहितीनुसार, जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये या अनधिकृत शाळा सुरू आहेत. श्रीवर्धन व म्हसळा तालुक्यात प्रत्येकी 3, खालापूरमध्ये 2, कर्जत, उरण व महाडमध्ये प्रत्येकी 1, अलिबागमध्ये 2 तर पनवेल तालुक्यात सर्वाधिक 22 शाळांचा समावेश आहे. या सर्व शाळा आवश्यक शासकीय मान्यतेशिवाय चालविल्या जात असल्याचे समोर आले आहे.

या पार्श्वभूमीवर संबंधित शाळांवर शिक्षण विभागाकडून आरटीई कायद्यांतर्गत कारवाई केली जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. अनधिकृत शाळांमध्ये प्रवेश घेतल्यास विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता असल्याने पालकांनी अधिक सतर्क राहणे आवश्यक आहे.

अनधिकृत शाळांची नावे

श्रीवर्धन - किड्स पॅरेडाईस प्रि स्कूल आराठी, इंपेरिअल स्कूल अयार मोहल्ला, अंजुमन इस्लाम जंजिरा रानवली. म्हसळा - अल इहसान इंग्लिश स्कूल, इतकान इंग्लिश स्कूल गोंडघर, ए.आर.उंड्रे इंग्लिश स्कूल मेंदडी , खालापूर - सेंट मेरी स्कूल कोपरी, भारती ॲकेडमी ॲण्ड ज्युनियर कॉलेज

खोपोली, कर्जत - सेंट औरा ई-टेक्नो स्कूल बांधिवली, उरण - नागराज स्कूल बोरी, अलिबाग - ज्ञानार्जन प्रि प्रायमरी सेमी इंग्लिश स्कूल बोडणी, सक्सेस एज्युकेशनल ॲण्ड वेल्फेअर सोसायटी एमएसटी इंटरनॅशनल स्कूल बोडणी, महाड - लिटील एंजल स्कूल पानसरी मोहल्ला महाड, पनवेल - आशाप्रभा न्यू इंग्लिश स्कूल विचुंबे, न्यू इंग्लिश स्कूल नेरे, एसजीटी इंटरनॅशनल स्कूल करंजाडे से.4, बुद्धिष्ट इंटरनॅशनल स्कूल करंजाडे से.3, वेदिक ट्री इंटरनॅशनल स्कूल करंजाडे से.3, दि वृद्धिष्ट इंटरनॅशनल स्कूल ओवळे दापोली, सनराईज इंग्लिश स्कूल वावंजे, लक्ष्मण अर्जुन पाटील इंग्लिश मिडीयम स्कूल वावंजे,

साई गणेश एज्युकेशन सोसायटी नवजीवन इंटरनॅशनल स्कूल खारपाडा, सेंट ग्रेगोरियस हायस्कूल शिरढोणपाडा, ऑक्सफोर्ड इंग्लिश स्कूल कळंबोली, मार्शमेलोज इंटरनॅशनल स्कूल ओवे, काळसेकर इंग्लिश मिडीयम स्कूल पाचनंद, अर्कम इंग्लिश स्कूल तळोजा, द वेस्ट हिल इंटरनॅशनल स्कूल तळोजा, ओशियन ब्राईट कॉन्वेंट हायस्कूल तळोजा, रोहिंजण इंग्लिश स्कूल रोहिंजण, बजाज इंटरनॅशनल स्कूल तळोजा, राईजिंग इंटरनॅशनल स्कूल कोपर उलवे, एसएमबी इंटरनॅशनल स्कूल उलवे, शाहीर बाळाराम पाटील इंग्लिश स्कूल शेडुंग, लक्ष्मी पब्लिक स्कूल सांगडे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT