Maharashtra Delimitation: महाराष्ट्रात लोकसभा मतदारसंघ वाढणार? 76 जागांची शक्यता

डिलिमिटेशननंतर विधानसभाही 320 पर्यंत; शहरांमध्ये मतदारसंघ वाढण्याचे संकेत
Maharashtra Delimitation
Maharashtra Delimitation(Pudhari File Photo)
Published on
Updated on

मुंबई : मृणालिनी नानिवडेकर

प्रस्तावित डिलिमिटेशन विधेयकानुसार महाराष्ट्रातील खासदारांची संख्या 48 वरून 76 तर विधानसभेतील आमदारांची सध्या असलेली 288 ही संख्या 320 पर्यंत जाण्याची शक्यता आहे. सध्या महाराष्ट्रातील प्रत्येक लोकसभा मतदारसंघात सरासरी सुमारे 17 लाख मतदार आहेत. हा मतदारसंघ यापुढे 12 ते 14 लाख मतदारांचा असेल. महाराष्ट्रातील खासदारांची संख्या 28 ने वाढण्याची शक्यता आहे.

Maharashtra Delimitation
Fadnavis Shinde Conflict: फडणवीस-शिंदे तणाव वाढतच : सातारा वादावरून आरोप-प्रत्यारोप तीव्र

नारी शक्ती वंदना विधेयकानंतर महिलांचे प्रतिनिधीत्व वाढेल

या वाढीव मतदार संघातील महिलांसाठी राखीव असलेले मतदारसंघ किती असतील याचे कोष्टक अद्याप लक्षात आलेले नाही. गेल्या काही दिवसांपासून नारीशक्ती वंदना विधेयकांनंतर महिलांचे प्रतिनिधित्व वाढेल हे स्पष्ट झाले होते. 2011 च्या यापूर्वी झालेल्या जनगणनेनुसार या मतदारसंघांचा आकडा ठरणार असल्याने आता 76 मतदारसंघ महाराष्ट्राच्या वाट्याला येतील असे मानले जाते आहे.

Maharashtra Delimitation
Mumbai Metro Internet: मेट्रोतील इंटरनेट सेवा ठप्प : कंपन्यांचा वाद चिघळला

3 ते 5 लाख मतदारांचा एक विधानसभा मतदारसंघ

विधानसभेतील आमदारांची सध्या असलेली 288 ही संख्या 320 पर्यंत जाण्याची शक्यता आहे. काहींच्या मते ही संख्या 380 पर्यंत जाईल. साधारणतः 3 ते 5 लाख मतदारांचा एक विधानसभा मतदारसंघ असेल.

महाराष्ट्रात शहरी भागात मतदारसंघ वाढणार

विद्यमान रचनेत एका लोकसभेत सहा विधानसभा मतदारसंघ असतात. यापुढे 76 ही लोकसभेची संख्या झाली तर त्यात सहा मतदारसंघ असतील की ती संख्या वाढवण्याचे ठरवले जाईल याचाही सध्या विचार सुरू आहे. महाराष्ट्रातील लोकसंख्या आता नागरी भागाकडे स्थलांतरित होत असल्याने ग्रामीण भागातील मतदार संघ वाढणार नाहीत.

Maharashtra Delimitation
Dhangar Reservation Protest: धनगर आरक्षणासाठी एकजुटीचे आवाहन : मनोज जरांगे-पाटील यांचा मुंबईत इशारा

अनुसूचित जातीचे मतदारसंघ 84 वरून 136

नागपूर पुणे ठाणे अशा महानगरांमध्ये सध्या एक लोकसभेचा मतदारसंघ आहे तो आता दोन लोकसभेत बदलेल असे समजते. त्यामुळे कार्यकर्त्याच्या अशा पालवल्या आहेत. देशात अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या मतदारसंघ संख्या 84 असून ते 136 होतील. तर आदिवासी राखीव मतदारसंघ 47 वरून 70 होतील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news