Raigad Heatwave Pudhari
रायगड

Raigad Heatwave: रायगडमध्ये उष्णतेचा तडाखा! पुढील 3 दिवस यलो अलर्ट जारी

मागील काही दिवसांच्या तुलनेत राज्यातील कमाल तापमानात वाढ झाली असून यामुळे तीव्र उन्हाचा तडाखा नागरिकांना सहन करावा लागत आहेत.

पुढारी वृत्तसेवा

रायगड: रायगड जिल्ह्यात सोमवारी तीव्र उकाड्याने हैराण केले. तर पुढील तीन दिवस रायगडसाठी तीव्र उष्णतेचे असणार असून मुंबई प्रादेशिक विभागाने ‌‘यलो अलर्ट‌’ जाहीर केला आहे. मागील काही दिवसांच्या तुलनेत राज्यातील कमाल तापमानात वाढ झाली असून यामुळे तीव्र उन्हाचा तडाखा नागरिकांना सहन करावा लागत आहेत.

वायव्य भारतावर समुद्रसपाटीपासून 12.2 किलोमीटर वर उष्णतेचा पट्टा तयार झाला आहे. कोकण पट्ट्यातील काही भागात उष्ण आणि दमट वातावरणाची नोंद होत आहे. सोमवारी अलिबागचे कमाल तापमान 34 अंश से. तर किमान तापमान 26 अंश से. पर्यंत होते. तर पुढील दिवस रायगड जिल्ह्याला ‌‘यलो अलर्ट‌’ देण्यात आला कमाल तापमान 35 अंश सेल्सिअस पर्यंत राहण्याचा अंदाज मुंबई प्रादेशिक विभागाने वर्तविला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT