रायगड

Raigad Gram Panchayat Election Result 2022 : महाड तालुक्यातील ग्रामीण भागात आमदार गोगावले यांचे वर्चस्व

मोहन कारंडे

रायगड/ महाड; पुढारी वृत्तसेवा : महाड तालुक्यातील ग्रामीण भागात आमदार भरतशेठ गोगावले यांचे वर्चस्व असल्याचे स्पष्ट झाले आहे. ग्रामपंचायत निवडणूक मतमोजणीतील पहिल्या फेरीत 32 ग्रामपंचायतींपैकी 11 ग्रामपंचायतीत आमदार गोगावले यांच्या नेतृत्वाखालील शिंदे गटाने सत्ता मिळवली आहे. दरम्यान रोहा तालुक्यातील पुई, खैरे खुर्द, पहूर या तीन ग्रामपंचायती राष्ट्रवादी ने जिंकल्या आहेत.

ग्रामपंचायत निवडणूकीची मतदान प्रक्रिया रविवारी पार पडली होती. मतमोजणी आज सुरू झाली असून पहिल्या फेरीत महाड तालुक्यात 32 ग्रामपंचायतींपैकी 11 ग्रामपंचायतींवर आमदार भरत गोगावले यांच्या नेतृत्वाखाली शिंदे गटाने वर्चस्व मिळविले आहे. यामध्ये अप्पर तुडील, नांदगाव बु, पारमाची, रानवडी, सवाने, आदीस्ते, वराठी, वारंगी वाघोली, धामणे, कुसगाव, शिरवली, लोअर तुडील, बीजघर, घावरेकोंड, पणदेरी, देशमुख कांबळे, तलीये, कारंजाडी, आडी, उंदेरी तर महाविकास आघाडीकडे आबवडे, वाळसुरे, सावरट, कोथेरी, लाडवली, वरंध, गोठे, मोहप्रे , गांधारपार्ले या ग्रामपचायतींचा समावेश आहे. तर महाविकास आघाडीच्या पाठींब्यावर भाजपची सत्ता चिभावे ग्रामपंचायतीवर आली आहे. वरंध ग्रामपंचायतीमध्ये महाविकास आघाडीचे वर्चस्व गोगावले यांच्या प्रतिष्ठेला धक्का समजले जात आहे.

माणगाव तालुका 16 पैकी पहिल्या 8 ग्रामपंचायतींचा निकाल जाहीर

शिरवली – महाविकास आघाडी
व्हावे – महाविकास आघाडी
डोगरोली – राष्ट्रवादी काँग्रेस
नादवी – अपक्ष
कुमशेत – उध्दव ठाकरे गट
दहिवली कोंड – महाविकास आघाडी
पहेल – महाविकास आघाडी
कुंभे – शिंदे गट
भागाड :- महाविकास आघाडी
मागरूल :- शिंदे गट
मुठवली तळे राष्ट्रवादी काँग्रेस
हरकोल:- महाविकास आघाडी
होडगाव :- गावसमिती आघाडी
चिचवली गोरेगाव : महाविकास आघाडी
साई:- राष्ट्रवादी विकास आघाडी
गोरेगाव :- महाविकास आघाडी

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT