रायगड : यंदा शुक्रवार, ४ सप्टेंबर रोजी श्रीकृष्ण जन्म (गोकुळाष्टमी) साजरी केली जाणार असून, शनिवार, ५ सप्टेंबर रोजी दहीहंडी व गोपाळकाला सण संपूर्ण रायगड जिल्ह्यात मोठ्या उत्साहात साजरा करण्यासाठी प्रशासकीय आणि पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. यंदा जिल्ह्यात तब्बल १,९५६ सार्वजनिक आणि ६,९१४ खाजगी अशा एकूण ८,८७० दहीहंड्या उभारण्यात येणार असून, उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेसाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असल्याची माहिती रायगड जिल्हा पाेलिस प्रशासनाने दिली आहे.
जिल्ह्यातील सर्व २८ पोलीस ठाण्यांच्या हद्दीत सार्वजनिक आणि खाजगी दहीहंड्यांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये कर्जत विभागात कर्जत पोलीस ठाण्याच्या हद्दीत १३५ सार्वजनिक व २९० खाजगी हंड्या आणि ९ सार्वजनिक मिरवणुका निघणार आहेत.
नेरळमध्ये ६८ सार्वजनिक व १५८ खाजगी हंड्या, माथेरानमध्ये ३ सार्वजनिक व १ खाजगी हंडी, खालापूरमध्ये ५ सार्वजनिक व १४६ खाजगी हंड्या आणि ५ मिरवणुका, खोपोलीत ६५ सार्वजनिक व ३ खाजगी हंड्या आणि १ मिरवणूक, तर रसायनीमध्ये १०५ सार्वजनिक व १४० खाजगी हंड्यांची नोंद झाली आहे.
पेण व अलिबाग उपविभागात पेण पोलीस ठाण्याच्या हद्दीत १२१ सार्वजनिक व २८० खाजगी हंड्या, दादर सागरी ठाण्यात ७० सार्वजनिक व ९५ खाजगी हंड्या आणि १ मिरवणूक, पोयनाडमध्ये ६० सार्वजनिक व ४६ खाजगी हंड्या आणि २२ मिरवणुका, वडखळमध्ये ११२ सार्वजनिक व १५५ खाजगी हंड्या, अलिबाग शहर ठाण्यात १२५ सार्वजनिक व ४१० खाजगी हंड्या आणि ३ मिरवणुका, रेवदंड्यात १३४ सार्वजनिक व २६४ खाजगी हंड्या, मुरूडमध्ये ८७ सार्वजनिक व १९३ खाजगी हंड्या आणि २१ मिरवणुका, तर मांडवा सागरी ठाण्याच्या हद्दीत ७९ सार्वजनिक व ११२ खाजगी हंड्या उभारल्या जाणार आहेत.
मध्य व दक्षिण रायगडमधील रोहा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ३९ सार्वजनिक व ५१ खाजगी हंड्या आणि ३९ मिरवणुका, कोलाडमध्ये २५ सार्वजनिक व ४४ खाजगी हंड्या, नागोठण्यात ५२ सार्वजनिक व २४५ खाजगी हंड्या आणि ४ मिरवणुका, पालीमध्ये ११६ सार्वजनिक व ४८ खाजगी हंड्या आणि १७ मिरवणुका, माणगावमध्ये १५ सार्वजनिक व ३१२ खाजगी हंड्या आणि १५ मिरवणुका, गोरेगावमध्ये २७ सार्वजनिक व ९५ खाजगी हंड्या आणि ६ मिरवणुका, तर तळ्यात ६८ सार्वजनिक व २०४ खाजगी हंड्यांची नोंद आहे.
श्रीवर्धन उपविभागात श्रीवर्धन ठाण्यात ३ सार्वजनिक व ८७३ खाजगी हंड्या आणि ३ मिरवणुका, म्हसळ्यात १०० सार्वजनिक व १११४ खाजगी हंड्या आणि १०१ मिरवणुका, तर दिघी सागरी ठाण्यात ५३ सार्वजनिक व १२४३ खाजगी हंड्या आणि ५३ मिरवणुका काढण्यात येणार आहेत.
महाड विभागात महाड शहरात ६५ सार्वजनिक व ७९ खाजगी हंड्या आणि १४ मिरवणुका, महाड तालुक्यात ९७ सार्वजनिक व १५७ खाजगी हंड्या आणि ५ मिरवणुका, महाड एमआयडीसी हद्दीत ४० सार्वजनिक व ७० खाजगी हंड्या आणि १७ मिरवणुका, तर पोलादपूरमध्ये ८७ सार्वजनिक व ७५ खाजगी हंड्या आणि २ मिरवणुका आयोजित करण्यात आल्या आहेत.
गोकुळाष्टमी उत्सव शांततेत आणि निर्विघ्नपणे पार पडावा यासाठी रायगड पोलीस दलाने कडक बंदोबस्ताचे नियाेजन केले आहे. या बंदोबस्तासाठी १५० पोलीस अधिकारी, ९५० पोलीस अंमलदार, ३५० होमगार्ड, एसआरपीएफची १ कंपनी आणि ६८ वाहतूक अंमलदार तैनात करण्यात आले आहेत. याशिवाय आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी ४ आरसीपी , १ क्युआरटी आणि ११ स्ट्रायकिंग पथके सज्ज ठेवण्यात आली आहेत. मिरवणुकीच्या मार्गांवर वाहतूक कोंडी होऊ नये आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून प्रमुख ठिकाणी पोलिसांची विशेष नजर असणार आहे.
गोकुळाष्टमी उत्सव शांततेत आणि निर्विघ्नपणे पार पडावा यासाठी रायगड पोलीस दलाने कडक बंदोबस्ताचे नियाेजन केले आहे. या बंदोबस्तासाठी १५० पोलीस अधिकारी, ९५० पोलीस अंमलदार, ३५० होमगार्ड, एसआरपीएफची १ कंपनी आणि ६८ वाहतूक अंमलदार तैनात करण्यात आले आहेत.