Raigad Fort Ropeway Maintenance  PUDHARI
रायगड

Raigad Ropeway Closed | रायगड रोप-वे दि. २३ ते २८ फेब्रुवारीदरम्यान बंद; पायरी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन

१ मार्चपासून रोप-वे सेवा पुन्हा पर्यटकांच्या सेवेसाठी सुरू होणार

पुढारी वृत्तसेवा

Raigad Fort Ropeway Maintenance

नाते : रायगड किल्ल्यावर जाणाऱ्या रायगड रोप-वेची वार्षिक तांत्रिक देखभाल व आवश्यक दुरुस्तीची कामे येत्या दि. २३ फेब्रुवारी २०२६ ते २८ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत करण्यात येणार आहेत. या कामांमुळे सदर कालावधीत रोप-वे सेवा पूर्णतः बंद ठेवण्यात येणार आहे.

दरवर्षी सुरक्षितता व सेवा-सातत्य राखण्यासाठी रोप-वेची तांत्रिक तपासणी, देखभाल तसेच आवश्यक दुरुस्तीची कामे केली जातात. त्याचाच भाग म्हणून ही वार्षिक देखभाल राबवली जाणार असल्याचे रोप वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे या कालावधीत रायगड किल्ल्यावर येणाऱ्या पर्यटकांनी रोप-वे सेवेचा वापर न करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान, २८ फेब्रुवारीनंतर सर्व कामे पूर्ण करून १ मार्च २०२६ पासून रोप-वे सेवा पुन्हा पर्यटकांच्या सेवेसाठी सुरळीतपणे सुरू होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. पर्यटकांनी नियोजन करताना या बंद कालावधीची नोंद घ्यावी, असेही रोप वे प्रशासनाने कळविले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT