Raigad Fort Search Operation Pudhari
रायगड

Raigad Fort Search Operation: रायगड किल्ल्यावर बेपत्ता तरुणाचा शोध संपला; ड्रोन कॅमेऱ्याच्या मदतीने मृतदेहाचा ठाव

३ ऑक्टोबरपासून सुरू होती शोधमोहीम; टकमक टोक परिसरातून खोल दरीत मृतदेह बाहेर काढण्यात रेस्क्यू टीमला यश

पुढारी वृत्तसेवा

नाते: किल्ले रायगडवरुन खेड येथील ३७ वर्षीय सुयोग सुरेश पांचाळ हा तरुण शनिवारी सकाळ पासून बेपत्ता असल्याच्या वृत्तानंतर स्थानिक पोलिस व रेस्क्यू टिम यांनी सुरू केलेल्या शोध मोहिमेत रविवारी सकाळी ,सुयोग पांचाळ यांचा मृतदेह आढळून आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवारी सायंकाळपासून रेस्क्यु टिमच्या मदतीने शोध मोहीम सुरू केली होती परंतु रात्र झाल्याने थांबवलेली.

ही शोध मोहीम रविवारी सकाळी पुन्हा सुरु करण्यात आली. ड्रोन कॅमेऱ्याच्या सहाय्याने मृतदेहाचा शर्ट खोल दरीत दिसून झाल्यानंतर अथक परिश्रमानंतर रेस्क्यु टिमचे जवान आपदा मित्र व पोलिसांनी मृतदेहा जवळ पोहोचून मृतदेह बाहेर काढला.

पत्नीला व्हॉट्सॲपवर जीवन संपविण्याबाबत सूचक संदेश

महाड तालुका पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार मुळाचा रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यांतील बीजघर येथे राहाणारा सुयोग सुरेश पांचाळ हा ३७ वर्षांचा तरुण सध्या ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरातील रामनगर येथे रहात होते.

त्यांनी ३ ऑक्टोबर रोजी पहाटे किल्ले रायगडाच्या पायथ्याशी आपली कार क्रमांक एमएच-०४-एमआर-६१६७ ही रायगडाच्या पायथ्याशी पार्क करून पायरी मार्गाने किल्ल्यावर गेले. सकाळी साडेसातच्या सुमारास ते टकमक टोक परिसरात पोहोचले. त्यानंतर त्यांनी पत्नीला व्हॉट्सॲपवर संदेश पाठवून जीवन संपविण्याबाबत सूचक संदेश पाठविल्याची माहिती नातेवाईकांकडून मिळाली. त्यानंतर त्यांचा मोबाईल बंद झाला.

या प्रकाराची माहिती मिळताच त्यांच्या भावाने किल्ले रायगड परिसरात शोध घेण्यास सुरुवात केली. तसेच पोलिसांना माहिती देण्यात आल्यानंतर पोलिस पथकानेही रेस्क्यु टिम व आपदा मित्रांच्या मदतीने शनिवारी दुपार नंतर गडपरिसरात शोधमोहीम हाती घेतली. पायथ्याशी संबंधित व्यक्तीचे वाहन आढळून आले.

शनिवारी रात्र झाल्याने रविवारी सकाळपासून शोधमोहीम अधिक व्यापक करण्यात आली. ड्रोनच्या सहाय्याने परिसराची पाहणी केली असता एका ठिकाणी मृतदेह आढळल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. मृतदेह बाहेर काढण्यासाठी रेस्क्यू टीमकडून प्रयत्न सुरू करण्यात आले.

या शोधमोहिमेत रेस्क्यू टीम कोलाडचे सागर दहीआंबेकर, एडवेंचर सोल महाडचे विशाल खांबे, शिलेदार एडवेंचर सोल कोल्हापूरचे सागर नलावडे तसेच आपदा मित्र महाडचे टीम लीडर अमिताभ जाधव सहभागी झाले होते.

पोलीस निरीक्षक अभिजीत नेवसे हे घटनास्थळी उपस्थित राहून मार्गदर्शन करीत होते. पोलिस प्रशासन आणि रेस्क्यू पथकाकडून अत्यंत कठीण भौगोलिक परिस्थितीत शोध व बचावकार्य करीत अखेर मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी महाड येथे शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

पत्नीला व्हॉट्सॲप मेसेज

सकाळी साडेसातच्या सुमारास ते टकमक टोक परिसरात पोहोचले. त्यानंतर त्यांनी पत्नीला व्हॉट्सॲपवर संदेश पाठवून जीवन संपविण्याबाबत सूचक संदेश पाठविल्याची माहिती नातेवाईकांकडून मिळाली. त्यानंतर त्यांचा मोबाईल बंद झाला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT