रायगड : दहा नगरपालिकांची रणधुमाळी आता जिल्ह्यात सुरू झालेली आहे.थंडीचा कडाका वाढत चालला आहे.त्याचबरोबर निवडणुकीच धुरळाही उडू लागलाआहे. माघारीची मुदत 21 नोव्हेंबर असली तरी जे अधिकृतउमेदवार रिंगणातआहेत त्यांनी प्रचाराला सुरुवात केलेली आहे. आधी गावातील देवदेवतांचे दर्शन घेत प्रचाराचा प्रारंभ करण्यात आला आहे. त्यानंतर मतदार दर्शनासाठी उमेदवा आपल्या समर्थकांसह मार्गस्थ होताना दिसत आहेत.
दहा नगरपालिकांसाठी अर्ज छाननीनंतर यामध्ये जिल्ह्यात एकूण 900 नगरसेवक पदांचे अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी 735 अर्ज वैध ठरले आहेत, तर 165 अर्ज अवैध ठरवण्यात आले आहेत. तसेच नगराध्यक्ष पदासाठी जिल्ह्यात मिळून 63 वैध अर्ज तर 17 अवैध अर्ज प्राप्त झाले आहेत.आता माघारीनंतर चित्र स्पष्ट होणार आहे.पण नगराध्यक्षपदासह जे उमेदवार अधिकृतपणे उभे राहणार आहेत त्यांनी आपापल्या शहरातील प्रभागांमध्ये प्रचार सुरू केलेला आहे.
अलिबागमध्येशेकाप, काँग्रेसआघाडीने प्रचाराचा नारळफोडत गावातील काळंबी देवी, मारुती नाक्यावरील हनुमान मंदिर,अलिशाह दर्गा आदी धार्मिक स्थळांना भेट देत देवदर्शन घेत आपल्या प्रचाराच प्रारंभ केला.नगराध्यक्षपदाच्याउमेदवारअक्षया प्रशांत नाईक यांच्यासह निवडणुकीसाठीउभेअसलेल सर्व उमेदवार, नेते, पदाधिकारी यावेळी सहभागीझालेे.
यावेळी प्रत्यक्ष प्रचाराला आठ ते दहा दिवसांचा कालावधी आहे.त्यामुळे घरोघरी प्रचार करण्यावरच उमेदवारांचा भर राहणा आहे.त्यात सर्वच शहरांमध्ये आता टोलेजंग गृह सोसायट्याझाल्याने प्रत्यक्षात मतदारांनाभेटण्यासाठी उमेदवारांना या सोसायट्यांच्या पायऱ्या चढताना,उतरताना दमछाक होणार हे नक्की.तरीही निदान मत मागायला जायला हवे या भूमिकेतून उमेदवार मतदारांनाभेटायला जात आहे.उमेदवारच घरी येतअसल्याने मतदारही खूष होत आहेत.
मतदार भेटीवरच जोर
जाहीर सभा, प्रचार सभांपेक्षा मतदार भेटीवरच या निवडणुकीत जोर दिला जात असल्याने उमेदवारही तशाच पद्धतीने प्रचार करतान दिसत आहेत.प्रचाराला अद्याप रंग चढला नसला तरी सुरुवात झाल्याने वातावरण निवडणूकमय झाल्याचे जाणवत आहे.या प्रचार रॅलीसोबत शासकीय यंत्रणाही लक्ष ठेऊन आहे.त्यामुळे आचारसंहितेचे कुठेही उल्लंघन होणार नाही याची दक्षताघेत उमेदवार आपल्या समर्थकांसह प्रचारातउतरल्याचे जाणवत आहे.
खोपोलीही नारळ फुटला
रायगडचे लक्ष खोपोलीतील निवडणुकीकडे लागलेेले आहे.येथे भाजप,शिवसेना यांची महायुती विरोधातअजित पवारांची राष्ट्रवादी,शेकाप,ठाकरे शिवसेन अशी तुल्यबळ लढत होणार आहे.बुधवारी महायुतीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार कुलदीपक शेंडे यांच्यासह महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचाराचा नारळ येथील विठ्ठल मंदिरात मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला,त्यानंतर प्रत्यक्ष मतदार भेटीला सुरूवात झाली.
कर्जतमध्ये धापयाला साकडे
कर्जत नगरपालिक हद्दीत ग्रामदेव धापय्या देवाला साकडे घालत उमेदवारांन प्रचाराचा प्रारंभ केला.यावेळी मतदार आम्हाला निवडूण देतील,असा विश्वासही व्यक्त करण्यात आला.