रायगड

रायगड: पोलीस उपअधीक्षक संजय सावंत यांचा राजस्थानमध्ये अपघातात मृत्यू

अविनाश सुतार

रायगड; पुढारी वृत्तसेवा : रायगड जिल्हा पोलीस दलातील गृह विभागाचे पोलीस उपअधीक्षक संजय सावंत (वय ५७ ) यांचा राजस्थानमधील जेसलमेरजवळील अपघातात मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी (दि.४) सायंकाळी ५ च्या सुमारास घडली. त्यांच्या मोटरसायकलला जीपने बेदरकारपणे धडक दिली. यात ते गंभीर जखमी झाले . त्यांच्या मृत्यूच्या वृत्तानंतर रायगड पोलीस दलात शोककळा पसरली आहे.

संजय सावंत हे एक उत्तम खेळाडू होते. मोटरसायकलवरुन विविध प्रांतांत प्रवास करुन तेथील अभ्यास करण्याचा छंद त्यांनी होता. आपल्या मोटरसायकलवरुन जेसलमेर येथून पुढील प्रवासासाठी ते निघाले होते. महामार्गावर पाठीमागून येणाऱ्या भरधाव जीपने त्यांच्या मोटरसायकलच्या उजव्या बाजूच्या फूटरेस्टला जोरदार धडक दिली. ते मोटरसायकलवरुन लांब अंतरावर फेकले गेले. गंभीररित्या जखमी झालेल्या संजय सावंत यांना रुग्णवाहिकेतून नेण्यात आले. मात्र, मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.

५ जानेवारी २००१ रोजी त्यांना एपीआय पदावर पदोन्नती मिळाली होती. त्यानंतर ते मुंबई पोलीस विशेष सुरक्षा  पथकात दाखल झाले. त्यानंतर राज्य पोलीस नियंत्रण कक्ष आणि सायबर क्राईल ब्रॅच येथे त्यांनी अत्यंत प्रभावी कामगिरी केली होती. त्यांच्या सायबर क्राईम  इन्व्हेस्टीगेशनच्या ज्ञानाचा अनुभव प्रशिक्षणार्थी पोलीस अधिकाऱ्यांना होण्यासाठी त्यांची नाशिक येथील महाराष्ट्र पोलीस अकॅडमीत बदली केली होती. त्यांनंतर मे २०२३ मध्ये ते रायगड जिल्हा पोलीस दलात गृह विभागाचे पोलीस उपअधीक्षक या पदावर रुजू झाले होते. ३४ वर्षांच्या पोलीस सेवेत त्यांना राज्य व राष्ट्रीय स्तरावरील विविध पोलीस पारितोषिके मिळाली होती.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT