‘निपुण महाराष्ट्र’ मध्ये रायगड जिल्ह्याची उल्लेखनीय प्रगती file photo
रायगड

‘निपुण महाराष्ट्र’ मध्ये रायगड जिल्ह्याची उल्लेखनीय प्रगती

67 शाळा राज्यस्तरावर ‘निपुण सुपर स्कूल’ म्हणून घोषित

पुढारी वृत्तसेवा

Raigad District's Remarkable Progress in 'Nipun Maharashtra'

अलिबाग : पुढारी वृत्तसेवा

राष्ट्रीय शिक्षण धोरण सन 2020 नुसार प्राथमिक स्थरावर सन 2026-27 पर्यंत पायाभूत व संख्याज्ञान कौशल्ये प्राप्त करण्यास प्राधान्य देण्यात आले आहे. याकरीता शासनामार्फत ‘निपुण महाराष्ट्र’ अभियान राबवण्यात येत आहे. या महत्त्वाकांक्षी अभियानांतर्गत इयत्ता दुसरी ते पाचवीपर्यंतच्या प्रत्येक विद्यार्थ्यांच्या पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान कौशल्याच्या पडताळणीकरीता मासिक चाचण्यांचे आयोजन करण्यात आले होते.

यामध्ये डिसेंबर 2025 ते मार्च 2026 मधील विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे अवलोकन केले असता लक्षणीय वाढ झाली आहे. यामुळे जिल्ह्यातील 167 शाळा राज्यस्तरावर ‘निपुण सुपर स्कूल म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत. या शाळांमधील विद्यार्थ्यांनी 80 ते 100 टक्के अध्ययन स्तर क्षमता प्राप्त केल्या आहेत.

शासनामार्फत ‘निपुण महाराष्ट्र’ सुरू करण्यात आले आहे. या अभियानाच्या अनुषंगाने जिल्ह्यातील प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांच्या पायाभूत साक्षरता (वाचन व लेखन) आणि संख्याज्ञान कौशल्य (संख्याज्ञान व संख्यावरील क्रिया) यांच्या विकास व्हावा हा ध्यास आहे.

याकरीता राजिपच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले व शिक्षणाधिकारी (प्राथमिक) लिलिता दहितुले यांच्या संकल्पनेमधून प्रथम एज्युकेशन फाउंडेशनच्या ‘लर्निंग इंप्रूवमेंट प्रोग्राम’ व ओपन लिंक्स फाउंडेशन (विनोबा अॅप) हे उपक्रम राबवण्यात आले. यांचेमार्फत जिल्ह्यातील इयत्ता 2 री ते 5 वीच्या विद्यार्थ्यांचे वाचन, लेखन, संख्याज्ञान व संख्यावरील क्रियाविषयक विविध पायाभूत, शिष्यवृत्ती व अंतिम मूल्यमापन चाचण्यांद्वारे नियमित सराव घेण्यात आले.

यामुळे शैक्षणिक गुणवत्तेत लक्षणीय सुधारणा झाली आहे. यामुळे जिल्ह्यातील 167 शाळा राज्यस्तरावर ‘निपुण सुपर स्कूल म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत. निपुण महाराष्ट्र अभियानाच्या प्रगतीकरीता व पुढील वाटचालीकरीता रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मंगेश वाकडीकर, उपाध्यक्ष मधुकर पाटील व अर्थ व शिक्षण सभापती चंद्रकांत कळंबे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

‘निपुण महाराष्ट्र’ उपक्रमात राजिपच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, सर्व गटशिक्षणाधिकारी, केंद्रप्रमुख व सर्व शिक्षकांचा मोलाचा सहभाग आहे. सर्वोत्तम स्थर (80 ते 100 टक्के) प्राप्त विद्यार्थ्यांची संख्या वाढवण्यासाठी यापुढेही अशाचप्रकारचे उपक्रम राबविणार असल्याचे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) ललिता दहितुले यांनी सांगितले.

सर्वोत्तम स्तर प्राप्त विद्यार्थी संख्या

डिसेंबर 2025 मार्च 2026

वाचन 21,362 34,267

लेखन 17,511 32,359

संख्याज्ञान 35,178 49,745

संख्यावरील क्रिया 27,383 42,989

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT