Raigad Dahi Handi Pudhari
रायगड

Raigad Dahi Handi: रायगडमध्ये आज तब्बल ८,८७० दहीहंड्यांचा थरार! 'गोविंदा आला रे आला'चा गजर

रायगड जिल्ह्यात श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि गोपाळकाल्यानिमित्त तब्बल ८,८७० दहीहंड्यांची उभारणी करण्यात आली आहे. १,९५६ सार्वजनिक, ६,९१४ खाजगी दहीहंड्या आणि ३२४ सार्वजनिक मिरवणुकांसाठी कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

पुढारी वृत्तसेवा

रायगड: ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन स्पर्शाने पुनीत झालेल्या रायगड जिल्ह्यात श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि गोपाळकाल्याचा सण अत्यंत प्राचीन परंपरेने आणि दिमाखात साजरा केला जात आहे.

यंदा जिल्ह्यात तब्बल १,९५६ सार्वजनिक आणि ६,९१४ खाजगी अशा एकूण ८,८७० दहीहंड्यांची उभारणी करण्यात येत असून सुरक्षा व्यवस्थेसाठी कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

यंदा रायगड जिल्ह्यात १,९५६ सार्वजनिक तर ६,९१४ खाजगी अशा एकूण ८,८७० दहीहंड्या उभारण्यात आल्या आहेत.जिल्ह्यात एकूण ३२४ सार्वजनिक मिरवणुका आयोजित करण्यात आल्या आहेत.

यात म्हसळा (१०१ मिरवणुका), दिघी सागरी (५३ मिरवणुका), रोहा (३९ मिरवणुका), पोयनाड (२२ मिरवणुका) आणि पाली (१७ मिरवणुका) येथे ऐतिहासिक परंपरेनुसार भव्य मिरवणुका निघणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT