रायगड ः कु-हाडीने घाव करून नऊ महीन्यांची गर्भवती असलेल्या भावजयीचा निर्घृण खुन करून 24 वर्षे फरार झालेल्या आरोपीच्या मुसक्या आवळण्यात रायगड जिल्हा पोलीस दलाच्या नेरळ पोलीस विभागाला यश आले आहे.
याबाबत पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, या गुन्हयातील फिर्यादी व आरोपी हे एकमेकांचे नात्याने भाऊ आहेत. दोन्ही राहणारे पोही, पो. कळंब ता. कर्जत, जि. रायगड येथील आहेत. आरोपी हा कोणत्याही प्रकारे कामधंदा करीत नव्हते. फिर्यादी व त्याची मयत पत्नी गुलाब हीचे बरोबर किरकोळ कारणावरून भांडण करीत होते.
2 फेब्रुवारी 2001 रोजी सकाळी 8 वाजण्याचे सुमारांस फिर्यादी हे त्यांचे पोही गावामध्ये असणा-या वीटभट्टीवर गेले होते. त्यानंतर दुपारी कळंब येथुन मच्छी घेउन ते परत त्यांचे पोशीर येथील घरी आले त्यावेळी त्यांचा भाऊ आरोपी संतोष हा त्यांचे पत्नीबरोबर भांडण करीत होता. त्यादरम्यान फिर्यादी यांची आई व त्यांनी आरोपी यांची समजूत घालुन घरात पाठविले. त्या गोष्टीचा राग आरोपी यांना येउन त्यांनी घरातुन कु-हाड आणून मयत गुलाब राणे हीचे मानेवर, हातावर, दंडावर कु-हाडीचे घाव घालुन तिचा खुन केला. याबाबची फिर्याद अनिल गणपत राणे, राहणार पोशीर यांनी नेरळ पोलीस ठाणे येथे दिलेली होती. सदरचा खुन करून आरोपी संतोष गणपत राणे हा गेली 24 वर्षे फरार झालेला होता,
पोलीस अधीक्षक रायगड यांनी केलेल्या आदेशानुसार सदर आरोपी याचा शोथ घेण्यासाठी नेरळ पोलीस ठाणेकडून एक तपास करण्यात आलेले होते. सदर पथकाद्वारे आरोपी याचे सध्याचे वास्तव्याबाबत त्याचे नातेवाईक यांचेकडे माहीती विचारली. परंतु सदर आरोपी याची कोणीही माहीती दिलेली नाही. त्यानंतर सदर आरोपी याचा शोध तांत्रीक तपासाद्वारे केला असता, आरोपी याचे वास्तव्याबाबत 20 नोव्हेंबर 2025 रोजी मिळालेल्या माहीतीनुसार सदर आरोपी हा फेमस चौक सांगवी पिंपरी विंचवड या ठिकाणी असल्याचे निष्पन्न झाले.
आरोपी यांस कसोशीने प्रयत्न करून ताब्यात घेतले. प्राथमिक चौकशी केली असता तो, सदर ठिकाणी आरोपी हा त्याचे मुळ नाव बदलुन संतोष गणपत पाटील अशी ओळख बदलुन राहुन केटरर्सचे काम करीत असताना पोलीस पथकाने त्यास ताब्यात घेतले. सदर आरोपी यांस पोलीस ठाण्यात आणुन त्याचेकडे चौकशी केली असता त्याने केलेल्या गुन्हयाची कबुली त्याने दिली आहे. सदर आरोपी यांस कौशल्या पूर्ण रीत्या अटक करण्याची कार्यवाही बेरळ पोलीस ठाणे कडील सहा. पोलीस निरीक्षक शिवाजी ढवळे, पोलीस उपनिरीक्षक भास्कर गंगाधर गच्चे, पोशि केकाण, पोशि बेद्रे यांनी विशेष कामगिरी केलेली आहे.