Central Railway on ticketless passengers
रोहे महादेव सरसंबे
मुंबई : रेल्वे प्रवास अधिक सुरक्षित आणि शिस्तबद्ध करण्यासाठी मध्य रेल्वेने कंबर कसली आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या आठ महिन्यांत (एप्रिल ते नोव्हेंबर २०२५) विनातिकीट आणि अनधिकृत प्रवास करणाऱ्या २७.५१ लाख प्रवाशांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याकडून तब्बल १६४.९१ कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
महसूल आणि प्रकरणांमध्ये मोठी वाढ गेल्या वर्षीच्या (२०२४-२५) तुलनेत यंदा विनातिकीट प्रवाशांच्या संख्येत १० % तर दंडाच्या रकमेत १९ % वाढ झाली आहे. एकट्या नोव्हेंबर २०२५ मध्ये ३.७४ लाख केसेस नोंदवून २३.६३ कोटींचा दंड वसूल करण्यात आला, जो मागील वर्षीच्या याच महिन्याच्या तुलनेत ६८ % अधिक आहे.
विभाग - भुसावळ, प्रकरणांची संख्या (लाख) - ६.९४, वसूल केलेला दंड (कोटी) ५९.२५
मुंबई - ११.३४, ४८.७९
पुणे - ३.०५, १८.४०
नागपूर - २.९२ १८.१३
सोलापूर - १.६० ७.५०
मुख्यालय - १.६६ १२.८२
एकूण - २७.५१ १६४.९१
कठोर तपासणी मोहीम
मध्य रेल्वेने अनधिकृत प्रवासाला आळा घालण्यासाठी 'किल्ला' (Fortress Check), अचानक तपासणी आणि 'मेगा तिकीट तपासणी' यांसारखी बहुसूत्री रणनीती अवलंबली आहे. मेल, एक्स्प्रेस, विशेष गाड्यांसह मुंबई आणि पुणे उपनगरीय लोकलमध्ये ही मोहीम तीव्र करण्यात आली आहे.
बनावट तिकीट पडेल महागात!
रेल्वेने प्रवाशांना बनावट तिकिटांपासून सावध राहण्याचा इशारा दिला आहे. बनावट तिकीट बाळगणे हा भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत गंभीर गुन्हा असून, यासाठी दंड आणि ७ वर्षांपर्यंत कारावासाची तरतूद आहे.
प्रवाशांना आवाहन
प्रवाशांनी तिकीट खिडकी, ATVM मशीन, IRCTC संकेतस्थळ किंवा http://www.irctc.co.in , http://www.irctc.co.in द्वारे वैध तिकीट काढूनच सन्मानाने प्रवास करावा. या संकेतस्थळावरून जारी करण्यात आलेल्या वैध तिकिटांसहच प्रवास करावा, असे आवाहन मध्य रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे. विनातिकीट प्रवासाबाबत रेल्वेने 'झिरो टॉलरन्स' (शून्य सहनशीलता) धोरण स्वीकारले आहे.