Ambewadi Canal Death
कोलाड : आंबेवाडी येथील गणेश नगर येथे कालव्याच्या पाण्यात तोल जाऊन पडल्याने एका तरूणाचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी घडली. गजानन लक्ष्मण जंगम (वय ४८, रा. आंबेवाडी, गणेश नगर) असे मृत तरूणाचे नाव आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आंबेवाडी येथील गणेश नगर येथील कालव्याच्या पाण्यात तोल जाऊन गजानन जंगम याचा मृत्यू झाला. घटनास्थळी कोलाड पोलिस ठाण्याचे सपोनि नितीन मोहिते यांनी भेट दिली. तसेच सह्याद्री वन्यजीव रक्षणार्थ सामाजिक संस्थेची टीम दाखल झाली. त्यांनी मृतदेह कालव्याच्या पाण्यातून बाहेर काढला. अधिक तपास कोलाड पोलिस ठाण्याचे सपोनि मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली आंबेतकर करीत आहेत.