Raigad dam water level increase : रायगड जिल्ह्यातील 28 धरण क्षेत्रात पाणीसाठा वाढला

समाधानकारक पावसाने सरासरी 86.17 टक्के पाणीसाठा, 18 धरणे 100 टक्के भरली
Raigad dam water level increase
रायगड जिल्ह्यातील 28 धरण क्षेत्रात पाणीसाठा वाढलाpudhari photo
Published on
Updated on
रोहे ः महादेव सरसंबे

रायगड जिल्ह्यात समाधानकारक पाऊस पडल्यामुळे जिल्ह्यातील 28 धरणक्षेत्रात पाणीसाठा वाढला असून 28 धरणक्षेत्रात सरासरी 86.17 टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. गेल्या वर्षापेक्षा यावर्षी धरण क्षेत्रात पाणीसाठा जास्त आहे.

रायगड जिल्ह्यातील 28 धरणांपैकी 18 धरणे शंभर टक्के भरले आहेत. जिल्ह्यातील 5 धरणांमध्ये 75 टक्के पेक्षा जास्त पाणीसाठा उपलब्ध झाले असून लवकरात ही 5 धरणे 100 टक्के भरण्याच्या मार्गावर आहेत. जिल्ह्यातील 18 धरणक्षेत्रातून पाण्याचा विसर्ग होत आहे. 3 धरण क्षेत्रात 76 ते 99 टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला आहे.

जिल्ह्यातील फक्त दोन धरणक्षेत्रात 50 टक्के पेक्षा कमी पाणीसाठा आहे. यामध्ये अलिबाग तालुक्यातील श्रीगांव धरणात 35 टक्के भरले असून दुसरे श्रीवर्धन तालुक्यातील रानीवली धरणात 19 टक्के भरले आहे.

रायगड जिल्ह्यातील 100 टक्के भरलेला धरणांमध्ये रोहा तालुक्यातील सुतारवाडी, म्हसळा तालुक्यातील पाभरे, संदेरी, महाड तालुक्यातील खिंडवाडी, कोथुर्डे, खैरे, वरंध, सुधागड तालुक्यातील कोंडगांव, उन्हेरे, खालापूर तालुक्यातील भिलवले, कलोते मोकाशी, डोणवत, तळा तालुक्यातील वावा, मुरुड तालुक्यातील फणसाड, पेण तालुक्यातील आंबेघर पनवेल तालुक्यातील उसरण आदी धरणांचा समावेश आहे या धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

जिल्ह्यातील अन्य धरणांमध्ये श्रीवर्धन तालुक्यातील कुडकी धरणक्षेत्रात 88 टक्के पाणीसाठा उपलब्ध, कर्जत तालुक्यातील अवसरे धरणक्षेत्रात 78 टक्के पाणीसाठा उपलब्ध, पनवेल तालुक्यातील मोरबे धरणक्षेत्रात 76 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे.

श्रीवर्धन तालुक्यातील कार्ले धरणक्षेत्रात 64 टक्के पाणीसाठा उपलब्ध, पनवेल तालुक्यातील बामणोली धरणक्षेत्रात 81 टक्के पाणीसाठा उपलब्ध, उरण तालुक्यातील पुनाडे धरणक्षेत्रात 57 पाणीसाठा उपलब्ध, सुधागड तालुक्यातील ढोकशेत धरणक्षेत्रात 65 टक्के पाणीसाठा उपलब्ध, कर्जत तालुक्यातील साळोख धरणक्षेत्रात 51 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news