BJP NCP Pudhari
रायगड

Raigad News : दक्षिण रायगडमध्ये भाजप राष्ट्रवादी युती

उत्तर रायगडमध्ये शिवसेना भाजप युती; मंत्री गोगावले वैयक्तिक ताकदीवर लढणार

पुढारी वृत्तसेवा

रायगड ः रायगडमध्ये युती आघाडीचे चित्र अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी निश्चित झाले आहे. दक्षिण रायगडमध्ये राष्ट्रवादी भाजप युती झाली असून उत्तर रायगडमध्ये मात्र शिवसेना भाजप एकत्र आले आहेत. त्यामुळे मंत्री भरत गोगावले, दक्षिण रायगडमध्ये स्वबळावर लढणार आहेत. दक्षिण रायगडमधील युतीची घोषणा भाजप जिल्हाध्यक्ष खासदार धैर्यशील पाटील यांनी मंगळवारी तर त्यापूर्वी खासदार सुनील तटकरे यांनीही केली होती. त्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. पनवेलमध्ये शिंदे शिवसेनेने फारसे उमेदवार न दिल्यामुळे सेना भाजप युती झाली.

रायगड जिल्हा परिषद आणि 15 पंचायत समित्यांच्या निवडणुकांचे राजकीय चित्र स्पष्टझालेलेआहे. दक्षिण रायगडात शिंदेशिवसेनेला शह देण्यासाठीभाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस(अजित पवार) यांनी युती केली आहे.तर शिंदे शिवसेना आता स्वतंत्रपणे निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे. उत्तर रायगडात मात्र सर्वच राजकीय पक्षांनीआपापल्या सोयीनुसार युती,आघाडी करण्यावर भर दिल्याचे अर्ज माघारीनंतर स्पष्ट झालेले आहे.

दरम्यान, अर्ज माघारीनंतर आता जि.प.च्या 59 जागांसाठी 173 तर पंचायत समितीच्या 118 जागांसाठी 329 उमेदवार निवडणूक रिंगणातउरले आहेत. रायगडात आता महाडला राष्ट्रवादी ,भाजप विरुद्ध शिंदेशिवसेना अशी लढत होणार आहे. पोलापूरमध्ये राष्ट्रवादी- भाजप विरुद्ध शिंदे शिवसेना, शेकाप, रिपाइं अशी युती झालेली आहे.

माणगाव तालुक्यात तिरंगी, श्रीवर्धन, म्हसळा येथे भाजप-राष्ट्रवादी विरुद्ध शिंदेशिवसेना,अलिबाग महाविकास आघाडी विरुद्ध शिंदे शिवसेना, विरुद्धभाजप अशी लढत अपेक्षित आहे. पनवेलमध्ये शेकाप विरुद्ध भाजप, कर्जतला परिवर्तन आघाडी विरुद्ध शिवसेना, भाजप महायुती, खालापूरमध्येही परिवर्तन आघाडी विरुद्ध शिवसेना,भाजप युती, उरणमध्ये भाजप विरुद्ध महाविकासआघाडी लढत आहे.

उमेदवाराची पळवापळवी

आदई पंचायत समिती गणातून महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार म्हणून शेतकरी कामगार पक्षाचे विलास फडके यांनी अर्ज भरला आहे. याच मतदारसंघातून ठाकरे शिवसेनेच्या अनिता डांगरकर यांनीही अर्ज भरला. यावेळी डांगरकर यांनी अर्ज मागे घ्यावा अशी शेकापची भूमिका होती. मात्र अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी या ठिकाणी नाट्यमय घडामोडी पहावयास मिळाल्या. अर्ज मागे घेण्यापासून रोखण्यासाठी त्यांना पळवून नेल्याचा संशय शेकापला होता. त्यामुळे शेकाप महिला आघाडीच्या तेजस्विनी घरत यांनी कार्यकर्त्यांसह तहसील कार्यालयाबाहेर ठिय्या मांडला.

यावेळी गाडी अडवण्यात आली आणि कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. पळवापळवीचा हा सर्व प्रकार भाजपच्या पाठिंबामुळेच होत असल्याचा दावा शेतकरी कामगार पक्षाने केला. यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी येत सर्वांना शांत केले. अखेर चर्चेअंती अनिता डांगरकर यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला.

युतीच्या माध्यमातून लढू -धैर्यशील पाटील

रोहा तालुक्यात भाजपा व राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षांची युती होत असल्याची घोषणा भाजपचे दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष खा. धैर्यशील पाटील यांनी नागोठणे येथे केली. सर्व निवडणुका महायुतीच्या माध्यमातून लढविणार असल्याचे सांगितले. जनतेचे हित पाहणे आपल्या कार्यकर्त्यांची जबाबदारी असल्याने महायुतीचा आदर करीत जिल्ह्यात काही ठिकाणाचा अपवाद वगळता सर्व ठिकाणी भाजपा-राष्ट्रवादी (अजित पवार) युती झाली असल्याचेही ते म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT