खोपोली: सावरोली गावात पिसाळलेल्या कुत्र्याने तीन लहान मुलांना चावा घेऊन गंभीर जखमी केले आहे. महामार्गावर सावरोली गाव असल्याने बाहेरून नवीन नवीन कुत्री आल्याने गावात भटक्या कुत्र्यांची संख्याही लक्षणीय अशी झालेली आहे.
सोमवारी सावरोली गावातील तीन लहान मुलांना या पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेऊन एकाच्या तोंडावर तर एकाच्या कानावर तर एकाच्या पायावर चावा घरात लचके तोडून रक्तबंबाळ केले आहे यातील एक आपल्या नातेवाईकांकडे पाहुणा आलेल्या मुलाला या पिसाळलेल्या कुत्राने चावा घेतला.
त्याला उपचारासाठी अलिबाग येथील सिव्हिल रुग्णालयात पाठविण्यात आले तर एका आदिवासी मुलाला खालापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात त्याच्या तोंडाला व डोळ्याला चावा घेतल्याने उपचार देण्यात आले आहे.
त्यामुळे या पिसाळलेल्या भटक्या कुत्र्यांची दहशदीमुळे लहान मुलांसह नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण तयार झाले असून या पिसाळलेल्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा लागतोअशी मागणी जोर धरू लागली आहे.
सावरोली गावात भटक्या आणि पिसाळलेल्या कुत्र्यांची दहशद वाढली आहे त्यामुळे नागरिकांनी स्वताची आणि आपल्या परिवारामध्ये महिला लहान मुलांची काळजी घावी तसेच लहान मुलांना बाहेर पाठवून नये या पिसलेल्या कुत्रयांचा बंदोबस्त करावी.- अशोक कीलंजे, पोलीस पाटील सावरोली