खाणीतील स्फोटांमुळे टाटा कॅन्सर हॉस्पिटलला फटका pudhari photo
रायगड

Tata Cancer Hospital Kharghar: खारघर टेकडीवरील खाणीतील स्फोटांमुळे टाटा कॅन्सर हॉस्पिटलला फटका, संचालकांचं CM ना पत्र

Kharghar Tekdi: खारघर टेकडीवरील उत्खनन; रुग्णांचे नुकसान; संचालकांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

पुढारी वृत्तसेवा

Tata Cancer Hospital Kharghar Hill Quarry Blasts List

उरण : टाटा कॅन्सर हॉस्पिटलच्या मागे असलेल्या खारघर टेकड्यांवरील अनियंत्रित, बेकायदेशीर उत्खननामुळे इमारतींच्या बीम आणि स्लॅबमध्ये भेगा पडल्या आहेत, ज्यामुळे रुग्ण आणि जीवनरक्षक महागड्या उपकरणांना धोका निर्माण झाला आहे.

टाटा कॅन्सर हॉस्पिटल म्हणून प्रसिद्ध असलेल्या अ‍ॅडव्हान्स्ड सेंटर फॉर ट्रीटमेंट, रिसर्च अँड एज्युकेशन इन कॅन्सरचे संचालक डॉ. पंकज चतुर्वेदी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या निवेदनात आमच्या कर्करोग उपचार सुविधेजवळील वायव्य टेकडीचा गंभीर परिणाम झाला आहे, अनेक खड्डे खोदले गेले आहेत आणि हिरवळ नष्ट झाली आहे, असे सांगितले आहे.

स्फोटकांनी स्फोट करणे, त्यानंतर सघन ड्रिलिंग करणे, बधिर करणारा आवाज आणि विषारी धुळीचे ढग निर्माण करतात जे रुग्णांचे आरोग्य आणि आपल्या नाजूक पर्यावरणाला धोक्यात आणतात, असे डॉ. चतुर्वेदी म्हटले आहे आणि या विनाशकारी खाणी थांबवण्यासाठी आणि शाश्वत पर्याय शोधण्यासाठी सरकारच्या तात्काळ हस्तक्षेपाची मागणी केली आहे.

दरम्यान, पर्यावरण रक्षक नॅटकनेक्ट फाउंडेशनने माहिती अधिकार (आरटीआय) कायद्याद्वारे मिळवलेल्या माहितीवरून असे दिसून येते की कर्करोग रुग्णालयाच्या मागे असलेल्या खाणीसाठी कोणत्याही सरकारी परवानगी देण्यात आलेल्या नाहीत. नॅटकनेक्टचे संचालक बी.एन. कुमार यांनी मुख्यमंत्र्यांना केलेली तक्रार रायगड जिल्हाधिकार्‍यांकडे पाठवण्यात आली आहे.

या विशिष्ट खाणीसाठी कोणत्याही परवानग्या देण्यात आल्या नाहीत. शिवाय, पारसिक हिल उत्खनन प्रकरणात राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण (एनजीटी) ने 2018 मध्ये दिलेल्या निर्णयानुसार उत्खननासाठी पर्यावरणीय मंजुरी ही एक पूर्वअट आहे, असे कुमार यांनी निदर्शनास आणून दिले.

धूळ प्रदूषणाबद्दल चिंता

या खाणींमुळे हॉस्पीटलच्या इमारतीला इजा पोहचली असून त्यामुळे पावसाचे पाणी गळत आहे, ज्यामुळे स्वच्छ खोल्यांमध्ये बुरशी वाढत आहे त्यामुळे रुग्णांना धोका निर्माण होत आहे, अउढठएउ ला लागून असलेल्या अनियंत्रित दगड उत्खननामुळे वाढत्या आवाज आणि धूळ प्रदूषणाबद्दल चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT