Bomb threat : खारघरमधील खासगी शाळेला बॉम्बने उडवण्याची धमकी; शाळा केली रिकामी  file photo
रायगड

Bomb threat : खारघरमधील खासगी शाळेला बॉम्बने उडवण्याची धमकी; शाळा केली रिकामी

ई-मेलद्वारे धमकी मिळाल्यानंतर पोलिसांची धावपळ; बॉम्बशोधक पथकाकडून तपास सुरू, पालकांना घाबरून न जाण्याचे आवाहन

पुढारी वृत्तसेवा

Private school in Kharghar receives bomb threat; school evacuated

पुढारी वृत्तसेवा : पनवेल विक्रम बाबर खारघर येथील एका खासगी शाळेला बॉम्बने उडवून देण्याची धमकी ई-मेलद्वारे मिळाल्याने शुक्रवारी शाळा परिसरात खळबळ उडाली. खबरदारीचा उपाय म्हणून शाळा रिकामी करण्यात आली असून, नवी मुंबई पोलीस, खारघर पोलीस आणि बॉम्बशोधक पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. शाळेच्या परिसरात तपासणी आणि शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे.

ई-मेलद्वारे VIBGYOR शाळेला उडवून देण्याची धमकी मिळाल्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. विद्यार्थ्यांच्या आणि शाळेतील कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत शाळा रिकामी करण्यात आली. बॉम्बशोधक पथकाकडून परिसराची तपासणी केली जात आहे.

दरम्यान, प्राथमिक माहितीनुसार ही धमकी अफवा असण्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, कोणताही धोका टाळण्यासाठी पोलिसांकडून आवश्यक ती खबरदारी घेतली जात आहे.

या घटनेमुळे पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असले, तरी त्यांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. पोलिसांकडून तपास सुरू असून, धमकीच्या ई-मेलचा स्रोत आणि त्यामागील नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT