पोलादपूर: मुंबई - गोवा महामार्गावर भोगावजवळ रस्त्याच्या बाजूला उलटलेली खासगी बस (Pudhari Photo)
रायगड

Poladpur Bus Accident | मुंबई–गोवा महामार्गावर खासगी बस ४५ फूट खोल दरीत कोसळली; २२ प्रवासी गंभीर जखमी

पोलादपूर तालुक्यातील भोगाव गावानजीक घटना

पुढारी वृत्तसेवा

Mumbai Goa Highway accident

खेड: मुंबई–गोवा महामार्गावर रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यातील भोगाव गावानजीक सोमवारी (दि.२४) पहाटे पाचच्या सुमारास भीषण अपघात झाला. पुण्याहून खेडच्या दिशेने येणारी खासगी ट्रॅव्हलर बस महामार्गावरील पुलाच्या अलीकडे असलेल्या बॅरिकेटला धडक देत सुमारे 45 ते 50 फूट खोल दरीत कोसळली. या अपघातात २२ प्रवाशी गंभीर जखमी झाले असून त्यातील १० प्रवाशांची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे.

मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कामामुळे एक लेन बंद ठेवण्यात आली होती. पहाटे धुके असल्याने चालकाच्या नजरेस बॅरिकेटस् न पडल्याने हा अपघात घडल़्याचे सांगण्यात येते. बसची धडक बसताच ती थेट दरीत कोसळली. स्थानिक नागरिकांनी तत्काळ बचावकार्य सुरू करत जखमींना वर काढले. पोलिस व महामार्ग सुरक्षा पथकानेही घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले.

खेड तालुक्यातील कळंबनी उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या जखमींची नावे खालीलप्रमाणे

शामल विजय अंजर्लेकर (वय 40 रा. गिम्हवणे, दापोली), काजल मारुती शिगवण (23 रा. दमामे, दापोली), दिलीप शिवराम मोहिते (55 रा. तळसर, चिपळूण), अमरनाथ मिलिंद कांबळे (27 रा. लातूर), दिपाली दत्ताराम नाचरे (27 रा. भडवणे, दापोली), प्रतीक प्रकाश गुरव (22 रा. शिरवली, खेड), प्रिया प्रकाश गुरव (23 रा. शिरवली, खेड), आळंदी बालाजी नाचरे (74 रा. दमामे, दापोली), सर्वेश दीपक गुहागरकर (22 रा. आडे, दापोली), मयुरी मारुती शिगवण (45 रा. दमामे, दापोली) याशिवाय चालक, वाहक तसेच इतर दहा प्रवाशांना चिपळूण येथील खासगी रुग्णालयात तसेच डेरवण रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे.

घटनास्थळी मोठी वाहतूक कोंडी झाल्याने महामार्ग पोलिसांनी वाहतूक सुरळीत करण्यासाठी विशेष पथके तैनात केली आहेत. धुके, सुरू असलेले काम आणि अस्पष्ट बॅरिकेटिंग यामुळे हा गंभीर अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळत असून पुढील तपास पोलादपूर पोलीस करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT